ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बाबासाहेबांच्या शैक्षणिक धोरण व कार्याने मराठवाड्यास गती: राजेश राऊत

January 16, 202118:21 PM 58 0 0

जालना ( प्रतिनिधी) : मागासलेल्या मराठवाड्यात विश्वरत्न , महामानव ,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्था आणि त्यांचे शैक्षणिक धोरण यामुळे शैक्षणिक मागासलेपण दूर होऊन मराठवाड्याच्या विकासाला खरी चालना मिळाली. असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राजेश राऊत यांनी केले. जूना जालना भागातील नागसेन ग्रंथालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा करण्यात आला. या निमित्त आयोजित अभिवादन सोहळ्यात राजेश राऊत बोलत होते. अध्यक्ष स्थानी अरूण सरदार हे होते. महेंद्र रत्नपारखे, ग्रंथालयाचे उपाध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, गोरख खरात, प्रशांत राऊत, प्रदीप फुलाने यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.

राजेश राऊत पुढे म्हणाले की, एका खटल्यात विजय मिळवून दिल्याने निजामाकडून घेतलेल्या मोबदल्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी पिपल्स शैक्षणिक संस्थेची स्थापना केली. मराठवाडा आणि विदर्भातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणास मोठा आधार मिळाला. असे राऊत यांनी नमूद केले. गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी यासाठी मराठवाडा विद्यापीठास महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. अशी जनभावना पुढे आली. मात्र काही प्रवृतींनी केलेल्या विरोध आणि राजकारणामुळे चौदा वर्षे नामांतराची लढाई चालली. अनेक जण यात शहीद झाले.त्यांच्या बलीदानातून अखेर नामांतराचा लढा यशस्वी झाला. असे राजेश राऊत यांनी सांगितले.
अध्यक्षीय समारोपात अरूण सरदार यांनी नामांतर लढाई च्या इतिहासावर प्रकाश टाकला. ते मंतरलेले दिवस आजही मराठवाड्यातील जनता विसरू शकत नाही. असे सरदार यांनी नमूद केले.
राजेंद्र ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *