ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उरण मध्ये कोरोना लसीकरणाचा वेग वाढला

July 18, 202114:16 PM 40 0 0

उरण :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेला परतवीण्यासाठी सरकार र्तर्फे युद्धपातळीवर उपाययोजनां करण्यात येत आहेत.उरण मध्ये हि तालुका आरोग्य विभागाने कोरोना लसीकरणासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले होते.तसेच उरण मध्ये ग्रामीण आरोग्य केंद्र कोप्रोली , इंदिरागंधी ग्रामीण रुग्णालय उरण, नगरपरिषद शाळा उरण, जेएनपीटी हॉस्पिटल,आरोग्य उपकेंद्र, चिरनेर, विंधणे, जासई ,या लसीकरण केंद्रा व्यतिरिक्त काही ग्रामपंचायती,आस्थापने, स्वयंसेवी संस्थां लसीकरणासाठी पुढे येत असल्याने उरण मध्ये कोरोना लसीकरणाचा वेग वाढला आहे.

उरण मध्ये लसीकरण सुरु झाल्यापासून लसीच्या उपल्बाध्ते नुसार लसीकरण केंद्रावर पहिला आणि दुसरा डोस देण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. प्रशासनाच्या प्रयत्नामुळे आत्तापर्यंत 25641 नागरिकांना कोविशिल्ड चे तर 6088 नागरिकांना कोव्याक्सींनचे डोस मिळून उरण तालुक्यात एकूण 31729 नागरिकांना कोरोना लास देण्यात आली आहे.त्यापैकी, एकूण 24426 नागरीकाना पहिला डोस देण्यात आला आहे. तर 7303 नागरीकाना दुसरा डोस देण्यात आला आहे. तर 17123 नागारीक लसीच्या दुसऱ्सया डोस साठी प्रलंबित आहेत. यामध्ये 18 ते 44 वयोगटातील 4598 नागरिक 45 ते 60 वयोगटातील 8453 व 60 वर्षावरील 5261 नागरिकांना लास देण्यात आली आहे. त्याचबरोबर 4528 फ्रन्टलाइन वर्कर व 1586 हेल्थकेअर वर्कर यांनी देखील लसीचा डोस घेतला आहे

उरण तालुक्यातील लोकसंख्या लक्षात घेता आत्तापर्यंत झालेले लसीकरण कमी असले तरी सुरू असलेल्या लसीकरणाचा वेग वाढला आहे.आणी नागारीकानी उपलब्धतेनुसारमिळेल त्या केंद्रावर जाऊन लसिकरण करून घ्यावे आसे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी र्डो राजेंद्र इटकरे यांनी नागरिकांना केल आहे.

उरण मधील लसीकरणाची परिस्थिती

कोविशिल्ड डोस कोवॅक्सीन डोस

पहिला दुसरा पहिला दुसरा

फ्रट लाईन वर्कर 4146 1357 382 303
आरोग्य कर्मचारी 1518 777 68 64
वय वर्ष 18 ते 44 3027 73 1571 523
वय वर्ष 45 ते 60 7602 1426 851 725
वय वर्ष 60 च्या पुढे 4410 1305 851 750

एकूण 20703 4938 3723 2365

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *