जालना (प्रतिनिधी) : मोबाईलमधील फोन पे याचे माध्यमातुन लाखोची ऑनलाईन फ्रॉड करणारा आरोपी जालना सायबर पोलीस स्टेशन कडुन जेरबंद करण्यात आला आहे. या गुन्हयातील 1 लाख 35 हजार 130/- रूपये हस्तगत करण्यात जालना सायबर पोलीस स्टेशनला यश आले आहे. दिनांक 10/08/2021 रोजी फिर्यादी मंदिपसिंग पिता राजविरसिंग रा बिजनोर राज्य उत्तरप्रदेश याचा हा जालना येथे गुरूगणेश मुथा हाँस्पीटल येथे रिपेरिंगच्या रिपेरिंगच्या कामकाजासाठी आला असतांना त्याचा दिं- 05/08/2021 रोजी लाशिवाजी चौक ते गंगा हाँटेल दरम्यान ओपो कंपनीचा ए 9-2020 मॉडेल असलेला व त्याच जिओ कंपनीचे सिमकार्ड असलेला मोबाईल हरवला होता. त्या मोबाईल मधील फोन पे हया अॅप च्या माध्यमातुन दि. 5/8/2021 ते 9/8/2021 च्या दरम्यान अनोळखी आरोपीने ऑनलाईन फ्रॉड करून एकुण 3,34,490/- रू अशी रक्कम अशी रक्कमेचा अफारातफर केली.
प्रकरणी फिर्यादीने दि- 10/08/2021 रोजी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून गुरन- 569/2021 कलम 420,403,507,34 भादवि सह 66(क) 66(ड) माहीती तंत्रज्ञान अधिनीयम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरचा गुन्हा पुढील तपासकामी सायबर पोलिस स्टेशन येथे वर्ग झाल्याने सायबर पोलीस स्टेशनने तात्काळ दखल घेवुन सदरचा गुन्हा उघडकिस आणण्यासाठी सायबर पथकाने सदर गुन्हायाचे तांत्रिक विश्लेशन करून गुन्हयाच्या तपासात आरोपी नामे केतन शाम नखलव रा प्रियदर्शनी कॉलनी संभाजीनगर जालना हा निष्पन्न झाल्याने त्यास दि- 08/09/2021 रोजी ताब्यात घेवुन अटक केली गुन्हयांच्या तपासात आरोपीस बारकाईने विचारपूस करता फिर्यादीचा मिळालेल्या मोबाईल फोन पे चा वापर
करून सदर चा गुन्हा केला आहे तसेच त्याने ट्रान्सफर / विड्रॉल करून घेतलेल्या रकमेसंबधी दिलेल्या माहीतवरून महाराष्ट्र राज्यात भुसावळ, (जळगाव) व राज्या बाहेर इंदोर, खंडवा, बु-हानपुर, खरगोन राज्य मध्यप्रदेश या ठिकाणी तपास पथक पाठवून तपास करण्यात आला व गुन्हयांच्या तपासात आरोपीने दिलेल्या माहीतीच्या आधारे गुन्हयांतील फिर्यादी याची फ्रॉड झालेली एकुण रक्कम 3,34,490/- पैकी 1,33,080/- रूपये रोख व इतर असा एकुण 1,34,130 रकमेचा मुददेमाल तपासात हस्तगत करण्यात सायबर पोलिस स्टेशनला यश आलेले आहे. व उर्वरीत रक्कम हस्तगत करणेबाबत तसेच आरोपीचा फरार
असलेला साथीदार आरोपी याचा शोध घेत आहेत सदरचा पुढील तपास सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री गुणाजी शिंदे हे करित आहेत.
सदरची कारवाई ही मा. श्री. विनायक देशमुख पोलीस अधिक्षक, श्री. विक्रांत देशमुख अपर पोलीस अधिक्षक, श्री. सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी जालना. पो.नि. सुभाष भुजंग स्थागुशा जालना यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशन प्रमुख श्री गुनाजी शिंदे, मसपोनि श्रीमती किर्ती पाटील, पोउपनि श्री. डि.आर दराडे, Asi/ शिवाजी देशमुख, पोहेकाँ सुधिर गायकवाड, पोना/ अंबादास साबळे, लक्ष्मीकांत आडेप, सतीश गोफणे, गणेश राठोड, रईस शेख संदीप मांन्टे, इरफान शेख, दिलीप गुसिंगे मपोना/संगिता चव्हाण, मपोकाँ / अर्चना आधे, रेखा घुगे यांनी केलेली आहे.
Leave a Reply