कराड-पाटण (प्रतिनिधी सुप्रिया कांबळे) : अक्षरगणेशा काढुन घ्या अन् आपत्तीग्रस्तांसाठी देणगी द्या ,चित्रकार संदीप डाकवे यांचे आवाहन आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी किमान एक हजारच्या देणगीच्या रुपाने साथ द्या व त्या बदल्यात आवडीच्या नावाचा अक्षरगणेशा रेखाटून घ्या, असा आगळावेगळा कृतज्ञता चित्राविष्कार पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील सुप्रसिद्ध चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी केला आहे.
हटके कलाविष्कारासह सामाजिक बांधिलकीसाठी ओळखल्या जाणाऱ्या डाॅ.डाकवे यांनी याआधी ही निधी संकलन करुन विविध ठिकाणी योगदान दिले आहे. या उपक्रमांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत कलेच्या माध्यमातून राबवलेल्या उपक्रमातून गरजूंना लाखो रूपयांची रोख मदत केली आहे. महाराष्ट्रावरील पावसामुळे आलेल्या संकटात कलेच्या माध्यमातून निधी संकलनाची संकल्पना केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपत्तीग्रस्तांना मदत करण्याविषयी अक्षरगणेशा भेट देण्याचा आगळावेगळा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे.
किमान 1000 द्या –
डाॅ.संदीप डाकवे यांनी कलेच्या माध्यमातुन आपत्तीग्रस्तांसाठी निधी संकलन सुरु केले आहे. या उपक्रमासाठी किमान एक हजार रुपयांची देणगी देणाऱ्यांनी ते पैसे संदीप राजाराम डाकवे, शाखा कराड, खाते क्रमांक. 248203100004990 आयएफएससी कोड एसआरसीबी0000248 या अकाऊंटमध्ये जमा करायचे आहेत. जमा होणारा निधी थेट आपत्तीग्रस्तांना देण्यात येणार आहे.
या उपक्रमात सहभागी होवून आपले किंवा आपल्या प्रियजनांच्या नावातील अक्षरगणेशा रेखाटता येईल. या माध्यमातुन कलात्मक उपक्रमातून आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात देता येईल. तरी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन चित्रकार डॉ. संदीप डाकवे यांनी केले आहे.
या अक्षर गणेश कलाकृती बरोबरच डाॅ.डाकवे यांनी खडूतून अष्टविनायकाची कलाकृती, जाळीदार पिंपळाच्या पानावर श्री गणेश, भजनात तल्लीन झालेले गणराज, पोस्टरवरील आकर्षक गणेशाचे चित्र अशी विविध रुपे त्यांनी रेखाटून आपल्या कलेचे दर्शन घडवले आहे.
सर्जनशील मनाचे चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी नेहमीच जनजागृतीसाठी व मदतीसाठी आपला कुंचला चालवला आहे. केवळ चित्र काढण्याचा छंद न जोपासता आतापर्यंत कलेच्या माध्यमातून नाम फाऊंडेशनला रु.35 हजार, केरळ पुरग्रस्तांना रु.21 हजार, विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी साठी रु.6 हजार, कु. ईशिता पाचुपते यांना रु.5 हजार, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला रु.5 हजार, माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना रु.5 हजार, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 मध्ये रु.4 हजार, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला रु.3 हजार, ‘भारत के वीर’ या खात्यात रु.1,111/- चा निधी देण्यात आला आहे.
तसेच डाॅ.डाकवे यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून आतापर्यंत विविध उपक्रमांतून सुमारे एक लाख ब्याऐंशी हजाराचे साहित्य गरजूंना दिले आहे.
या उपक्रमांची दखल घेत डाॅ.संदीप डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून चार, तर विविध संस्थांकडून पन्नास हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. याशिवाय त्यांच्या नावाची ‘नोंद इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ मध्ये तीनदा तर ‘हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड’ मध्ये एकदा झाली आहे.
श्रीरामाने सेतु बांधताना खारुताईनेही चिमुट चिमुट माती टाकल्याचा रामायणात उल्लेख आहे. आज आपत्तीग्रस्तांना अशाच मदतीची गरज आहे. एक कलावंत म्हणून मी कलेच्या माध्यमातून असे अक्षरगणेशरुपी योगदान देवू शकतो. या प्रयत्नांना समाजाचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास डाॅ.संदीप डाकवे यांनी केला आहे आपत्तीग्रस्तांना देणगी देणारांची अक्षरगणेश रेखाटण्यात पाटण तालुक्यातील प्रसिद्ध चित्रकार डाॅ. डाकवे
Leave a Reply