अच्युत मोरे
ग्रामीण भागाच्या सर्वांगीन विकासासाठी निवडून दिलेल्या मिनी मंत्रालयातील अनेक जि. प. सदस्यांनी स्वतःच्या सर्कलमधील मतदारासोबत गद्दारी केली आहे. ज्या सर्कलमधून जिल्हा परिषद सदस्य निवडूण आला, त्या सर्कलमध्ये विकासकामे न करता, टक्केवारी घेऊन दुसर्या सर्कलमध्ये विकास निधी वर्ग करुन मतदारासोबत धोका केला आहे. अशा नमक हराम जि. प. सदस्यांवर कुणाचाही अंकुश नाही. त्यामुळे ग्रामणी भागातील अनेक विकासकामे निकृष्ठ दर्जाची होत आहेत तर अनेक ठिकाणी कामे न करताच बीले हडपल्याची चर्चा आहे. स्वतःच्या सर्कलमधील विकास निधी दुसर्या सर्कलमध्ये देणार्या जि.प. सदस्यांच्या विकास निधीची पुर्ण चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे खाल्लेल्या मिठाला न जागणार्या सदस्यांवर कारवाई होणार काय अशी चर्चा सुरु आहे. सध्या अनेक जि. प. सदस्यांच्या सर्कलचा विकास म्हणजे दिव्याखाली अंधार आहे.
जालना जिल्ह्याम अनेक भागातील विकासकामांना खिळ बसली आहे. नव नियुक्त सरपंच आणि उपसरपंच आपल्या गावात विकासकामे करण्यासाठी धडपड करीत आहेत. परंतु निधी कसा आणि कोणाकडून मिळवायचा याचे अज्ञान असल्याने अनेक सरपंचांची गोची झाली आहे. ग्रामपंचायत स्तरावर विकास निधी हवा असेल तर जिल्हा परिषद सदस्यांकडून अव्वाच्या सव्वा टक्केवारी मागीतली जात असल्याचेही प्रकार समोर आले आहेत. जिल्हा परिषद सदस्यांच्या निधी वाटपाचा मुद्दा पुढे आला आहे. ग्रामीण भागातील विकास साधण्याासाठी निवडूण दिलेले जिल्हा परिषद सदस्या स्वतःच्या सर्कलमध्ये विकास करण्या एैवजी दुसर्याच्या सर्कलमध्ये विकास निधी खर्च करीत असल्याचे पहायला मिळत आहे. हा निधी कसा आणि कुठे खर्च करायचा याचा अधिकारी त्या ज्या जिल्हा परिषद सदस्यांना असला तरी सुध्दा एक नैतिकता म्हणून किमान स्वतःच्या सर्कलमध्ये हा विकास निधी खर्च करणे अपेक्षीत आहे. परंतु ज्यांनी जास्त टक्केवारी दिली त्यांच्या घशात जिल्हा परिषद सदस्य निधी टाकत असल्याने अनेक ठिकाणी गजर असतांनाही विकास कामे होत नाहीत.
त्यामुळे ज्यांना विकास करण्यासाठी निवडूण दिले तेच सर्कलच्या विकासाला भकास करण्याचा सुरुंग लावत आहेत. ग्रामणी भागात होणारी विकासकामे ही दर्जाहीन आणि निकृष्ठ दर्जाची असल्याच्या प्रतिक्रीया सर्वसामान्य नागरीकांतुन व्यक्त केल्या जात आहेत. हा दर्जा तपासणी करणारी यंत्रणा देखील भ्रष्टाचाराने बरबटेलेली आहे. त्यामुळे कार्यालयात बसूनच कामाच्या दर्जा उत्तम असल्याचे पत्र दिल्या जात आहे. हा प्रकार तात्काळ थांबला नाही किंवा स्वतःच्या सर्कलमधील निधी दुसर्या सर्कलध्ये दिला असल्यास त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल करुन न्यायालयात जाणार्याचे संकेत आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजोग हिवाळे यांनी दिले अहेत.
पहिले प्राधान्य स्वतःच्या सर्कलमध्ये द्यावे – उत्तम वानखेडे
जिल्हा परिषदेकडून ज्या त्या सर्कलच्या सदस्यांना त्यांच्या त्यांच्या सर्कलमध्ये विकासकामे करण्यासाठी निधीची तरतुद केली जाते. त्यांना दिलेल्या निधीचा कुठे आणि कसा वापर करावा हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु ज्या-त्या सदस्यांनी प्रथम स्वतःच्या सर्कलमधील विकासकामांना प्राधान्य द्यवे व नंतर राहिलेला निधी इतरत्र खर्च करायला हवा असे जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तम वानखेडे यांनी दैनिक मराठवाडा केसरी सोबत बोलतांना सांगीतले.
Leave a Reply