ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

शहरातील आनंदनगर मधील कॉफी शॉपवर छापा टाकून कार्यवाही

August 22, 202115:11 PM 6 0 0

नांदेड प्रतिनिधी (रूचिरा बेटकर) : विमानतळ पोलीसांनी आनंदनगर मधील एका कॉफी शॉपवर कार्यवाही करून कॉफी शॉप मालकासह चार ग्राहकांवर कार्यवाही केली आहे.


विमानतळ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता त्यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार दोस्ती कॅफे अन्ड आयईस्क्रीम पार्लर, बियाणी कॉम्प्लेक्स आनंदनगर येथे तपासणी केली तेंव्हा त्यात चरण राजू गवाले (20) रा.हनुमानगढ, गंगाधर रामजी आरसुळे(19), शुभम श्रीहरी दासरवाड(21) आणि माधव अंकुश सांगळे (21) तिघे रा.श्रीनगर नांदेड हे युवक सापडले. कॅफे मालक शुभम निरंज भुसे (21) रा.कैलासनगर यांना ताब्यात घेवून पोलीसांनी त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110/117 नुसार कायदेशीर कार्यवाही केली आहे. पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे आणि त्यांच्या पथकाने कॉफी शॉपवर ही कार्यवाही केली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *