ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

प्रभाग क्रमांक सात मधून कार्यकर्त्यांनी तयारीला लागा : अर्जुनराव खोतकर

February 21, 202214:16 PM 33 0 0

जालना (प्रतिनिधी) : युवा सेनेचे शहर प्रमुख राजु सलामपुरे यांच्या संपर्क कार्यालयास माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी भेट देवून प्रभाग क्रमांक सात ढवळेश्‍वर येथील नागरी समस्यांचा आढावा घेतला असून येथील नागरीकांच्या समस्या जाणून घेत थेट नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क करून या समस्या संदर्भात माहिती दिली.
यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना खोतकर म्हणाले की, प्रभाग क्रमांक 7 मधुन शिवसेनेचा उमेदवार निवडूण देण्यसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने तयारीला लागावे अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या. यावेळी युवा सेनेचे विस्तारक अभिमन्यू खोतकर, पंडित भुतेकर, युवा सेना शहर प्रमुख राजू सलामपुरे, अल्पसंख्यांकचे उप जिल्हा प्रमुख शेख नजीर, अंकुश पाचफुले, अनुराग कपुर, नामदेव बोराडे, चेतन जैस्वाल, दत्ता पवार, भरत कुसुदल, राहुल शेळके, बबलु टेकाळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *