जालना (प्रतिनिधी) ः जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ताबडतोब करून आगामी जि. प., पं. स. आणि नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीच्या पुर्व तयारीसाठी कार्यकर्त्यांनी मोट बांधावी असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष ॲड. शिवाजीराव मोघे यांनी काल शनिवारी जालना येथे आयोजीत बैठकीत बोलतांना केले. जालना जिल्हा काँग्रेस कमिटीची शनिवार रोजी हॉटेल अथर्व येथे महत्वाची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे होते. यावेळी आ. कैलास गोरंट्याल, आ. राजेश राठोड, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी जिल्हाध्यक्ष भिमराव डोंगरे आर. आर. खडके, ज्ञानेश्वर भांदरगे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस कल्याण दळे, सत्संग मुंढे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना ॲड. मोघे म्हणाले की, जालना जिल्हा हा काँग्रेस विचाराचा आहे. परंतू अलीकडच्या काळात काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कमी पडल्यामुळे पक्षाची ताकद कमी झाली असली तरी जनाधार मात्र काँग्रेस पक्षाच्या बाजूने असल्याचे दिसून येत आहे. यासाठी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी पुर्ण शक्तीनिशी कामाला लागावे असे आवाहन ॲड. मोघे यांनी केले आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आहे. परंतू कोव्हिड आजारामुळे अनेक विकास कामे खुंटलेली आहेत आणि महामंडळासह जिल्ह्यातील शासकीय समित्या देखील रखडलेल्या आहेत. या नियुक्त्या शक्य तितक्या लवकर करण्यात येवून कार्यकर्त्यांना लवकरच न्याय दिला जाईल अशी ग्वाही ॲड. मोघे यांनी यावेळी दिली.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, कोव्हिड आजाराच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस पक्षाने जिल्ह्यामध्ये सर्वसामान्यांची मदत करून सेवा दिलेली आहे. ही बाब जनतेच्या समोर आलेलीच असून आ. कैलास गोरंट्याल यांनी जालना शहरासह इतर राज्यातील परप्रांतीय पाई जाणाऱ्या कामगारांना मोलाची मदत केलेली आहे. त्यांच्या या दैदिप्यमान कार्याचा देशपातळीवर विशेष उल्लेख झाला असल्याचे त्यांनी सांगीतले.
या बैठकीत बोलतांना आ. कैलास गोरंट्याल म्हणाले की, राज्यातील आघाडी सरकारने विकास निधी वाटपात काँग्रेस सोबत दुजाभाव केलेला आहे.
अशी नाराजी व्यक्त करून जिल्ह्यातील शासकीय समित्या लवकर घोषीत करून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना न्याय देण्याच्या संदर्भात पक्ष श्रेष्टींनी भूमीका घ्यावी अशी मागणी केली.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी बैठकीचे प्रस्ताविक करतांना सांगीतले की, जालना जिल्ह्यामध्ये तीन नगर परिषदा ह्या काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहेत. परंतू महाविकास आघाडी सरकारने या तीन्ही नगर परिषदांना विकास कामांसाठी तोकडा निधी दिला आहे. त्यामुळे नगर परिषद क्षेत्रातील विकास कामे रखडलेली आहेत. आगामी निवडणुक लक्षात घेता नगर परिषदांना मोठा निधी देण्यात यावा अशी मागणी करून महामंडळासह शासकीय कमिट्या तात्काळ घोषीत कराव्यात अशी मागणी श्री देशमुख यांनी केली.
यावेळी आ. राजेश राठोड, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, माजी जिल्हाध्यक्ष भिमराव डोंगरे यांनी पक्ष संघटनेच्या वाढिसाठी पक्ष श्रेष्टींनी जिल्ह्याकडे विशेष लक्ष द्यावे असे सांगीतले.
या बैठकीत प्रभाकर पवार, राहुल देशमुख, दिनकर घेवंदे, सुभाष मगरे, आनंद लोखंडे, शेख शमशु, न. प. गटनेते गणेश राऊत, महाविर ढक्का, आरेफ खान, सय्यद अजहर, शेख शकील, सजय भगत, किशोर गरदास, बालकृष्ण कोताकोंडा, चंद्रकांत रत्नपारखे, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, विठ्ठलसिंग राजपुत, लक्ष्मण म्हसलेकर, अरूण सरदार, शिवप्रसाद चितळकर, सुरेश गवळी, बाबासाहेब गाढे, आण्णासाहेब खंदारे, किसनराव मोरे, अरूण घडलिंग, राधाकिशन दाभाडे, कृष्णा पडूळ, नारायण वाढेकर, दत्ता शिंदे, सय्यद करीम बिल्डर, अशोक नावकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. कैलास गोरंट्याल यांचा कोव्हिड योध्दा म्हणून सत्कार
कोव्हिड आजाराच्या काळामध्ये आ. कैलास गोरंट्याल यांनी गोर-गरीब जनतेला दिलेला मदतीचा हात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून करोना रूग्णांच्या नातेवाईकांना केलेली मोलाची मदत त्याबद्दल आ. गोरंट्याल यांचा प्रदेश कार्याध्यक्ष ॲड. शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते शाल – श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जालना शहर काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून कोव्हिड मदत सहाय्य केंद्रामार्फत देण्यात आलेली सेवा याबद्दल डॉ. विशाल धानुरे, संजय भगत, शेख शकील, फकीरा वाघ, चंद्रकांत रत्नपारखे, गणेश चौधरी, मोहन इंगळे, सागर ढक्का, रहिम तांबोळी, गोपाल चित्राल, योगेश पाटील, जावेद अली या काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा शाल, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख महेमूद यांनी केले तर जिल्हा सरचिटणीस राम सावंत यांनी आभार मानले.
Leave a Reply