ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे –  लिंबाजी वाहूळकर

June 12, 202213:53 PM 21 0 0

जालना (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे यांच्या सूचनेनुसार आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगर पालिका निवडणूकीत आपला ठसा उमटविण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन रिपब्लिकन सेनेचे पश्चिम जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहूळकर यांनी केले. तर रिपब्लिकन सेनेची ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचावे, असे आवाहन पूर्व जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने यांनी केले.
शनिवार दि. 11 जून रोजी रिपब्लिकन सेनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयात पक्ष कार्यकर्त्यांची पश्चिम जिल्हाध्यक्ष लिंबाजी वाहूळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत श्री वाहूळकर यांनी रमाई व प्रधानमंत्री आवास योजनेचे जे 1 लाख 38 हजार रुपये मिळते. ते अत्यंत तुटपुंजे आहे. त्यात सर्वसामान्य माणसाला घर बांधता येत नाही. परिणामी, त्याला कर्ज काढावे लागते. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागासाठी यात वाढ करुन 2 लाख 50 हजार रुपये तर शहरी भागासाठी 3 लाख रुपेय अनुदान द्यावे, अशी मागणी केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी मिळणाऱ्या विहिरींना काही गावात भूजल सर्वेक्षण विभागाकडून पाणी पातळी कमी असल्याचे कारण पुढे करुन आडकाठी करण्यात येते. त्यामुळे मागासवर्गीयांच्या बागयतदार होण्याच्या स्वप्नाला तिलांजली देण्याचे काम हा विभाग करीत आहे. त्यामुळे ही अट रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. गायरान जमिनी कसरणाऱ्या कास्तकऱ्यांच्या नावे सातबारा देण्यात याव्यात, अशी मागणीही वाहूळकर यांनी केली.
यावेळी पूर्व जिल्हाध्यक्ष दिनेश आदमाने यांनी शासन जाणून-बूजून सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळत आहे. एकीकडे महागाई वाढत आहे. तर दुसरीकडे बेरोजगारीचा महाकळस गाठल्या जात आहे. बहुतांश गावात अनुसूचित जातीं व बौध्दांची घरे आहेत. त्यांना स्वतंत्र अशी स्मशानभूमी देखील आहे परंतु, तीची सातबाऱ्याबर नोंद नसल्याने अनेक ठिकाणी अंत्यसंस्काराच्या वेळेस वाद होतात. त्यामुळे स्मशानभूमीची सातबाऱ्यावर नोंद करण्याची मागणीही श्री आदमाने यांनी केली. या सह विविध मागण्यांसाठी दि. 28 जून मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही आदमाने यांनी सांगितले. यावेळी राहूल खरात यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केले.
यावेळी जिल्हा महासचिव चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक मच्छिंद्र आप्पा खरात, जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव अंभोरे, कामगार आघाडी अध्यक्ष सुरेश वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष अरूण म्हस्के, दादाराव काकडे, युवक अध्यक्ष शुभम हिवराळे, जालना तालुका अध्यक्ष भिमराज खरात, जिल्हा सचिव नवनाथ ठोके, जिल्हा सचिव मधुकर म्हस्के, कैलास उघडे, परतूर तालुका अध्यक्ष जयपाल भालके, संजय मघाडे, अंबड तालुकाध्यक्ष गोरख आपुट, परतूर शहराध्यक्ष गौतम पानवाले, महिला आघाडी अध्यक्षा कांताबाई बोरुडे, जिल्हा संघटक मथुराबाई मोरे, उपाध्यक्षा शोभाबाई म्हस्के, जालना तालुका अध्यक्ष सुमनबाई खरात, अंबडच्या शांताबाई हिवाळे, मंठ्याच्या इंदुबाई लहाणे, भगवान मघाडे, सुमनबाई मोरे, डॉ. प्रिया जैन, संपत खाडे, गौतम कोळे, किशोर साळवे, कुंडलिक वाहूळकर, शेख अकबर, भदर्गे, सोमाजी लहाने, ज्ञानदेव खरात, बबनराव खरात, भाऊराव कोळे, संतोष उन्हाळे, कैलास भालके, नितिन भादरगे, दादाराव दवंडे, रामभाऊ पाईकराव, अशोक पवार, गणेश हिवाळे, संजय मघाडे, संजय काळे, राहुल हिवराळे, चत्रभुज भालमोडे, दादाभाऊ भालमोडे, भगवान मघाडे, संतोष हिवराळे, दिपक खरात, भाऊसाहेब हिवराळे आदींसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आभार व सुत्रसंचालन जिल्हा महासचिव चंद्रकांत खरात यांनी मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *