ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

ऑनलाइन पॉर्नोग्राफी रॅकेट चालवल्या प्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठ अटकेत

February 7, 202115:01 PM 58 0 0

मुंबई: ‘गंदी बात’ वेब सीरिजची अभिनेत्री गहना वशिष्ठला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने अटक केली आहे. तिच्यावर पॉर्न व्हिडीओ तयार करणे आणि वेबसाईटवर ते अपलोड करणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संबंधी तिचे स्वत:चे एक प्रोडक्शन हाउस असल्याचं सांगण्यात येतंय.

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅन्चने अभिनेत्री गहना वशिष्ठला ऑनलाइन पॉर्नोग्राफी रॅकेट चालवल्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. शनिवारी तिची या प्रकरणी चौकशी सुरु होती. तिला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्यानंतर तिच्या जामीनाचा निकाल लागणार आहे. सूत्रांच्या मते, अभिनेत्री गहना वशिष्ठ सोबतच तिचे सहकारी, साइड मॉडेल्स आणि संबंधित इतर लोकांवर पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

काय आहे प्रकरण?
दोन दिवसापूर्वी मालाड येथे एका रेड दरम्यान पोलिसांना काही माहिती मिळाली होती. पोलिसांना असं समजलं होतं की मड आयलँड परिसरातील काही बंगल्यांमध्ये फिल्म शूटिंगच्या नावावर वेश्या व्यवसाय चालतो आणि शॉर्ट पॉर्न व्हिडीओ तयार करण्यात येतात. त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापेमारी केली. त्यावेळी पोलिसांच्या असं लक्षात आलं की या क्षेत्रात प्रवेश करायची इच्छा असलेल्या स्ट्रगलर मॉडेल्सना चित्रपटात ब्रेक देण्याच्या नावाखाली पॉर्न व्हिडीओत काम करायला सांगितलं जायचे. या प्रकरणी पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली आहे.
कोण आहे गहना वशिष्ठ?

गहना वशिष्ठ ही बालाजी प्रोडक्शनची अॅडल्ट सीरिज ‘गंदी बात’ ची अभिनेत्री आहे. तीने या पूर्वी मिस एशिया बिकिनीचा पुरस्कारही जिंकला आहे. गहना वशिष्ठने आतापर्यंत अनेक हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं असून अनेक जाहिरातीतही ती झळकली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *