ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अ‍ॅड. ब्रम्हाणंद चव्हाण यांचा मंत्रीमंडळात घ्या किंवा महामंडळावर नियुक्त करा; रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाच्या बैठकीत ठराव

July 11, 202214:57 PM 23 0 0

जालना (प्रतिनिधी)  : रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाची भाजप सोबत युती आहे. आता केंद्रात आणि राज्यात भाजप सत्तेत आहे. त्यामुळे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाचे मराठवाड्यातील नेते अ‍ॅड. ब्रम्हणंदन चव्हाण यांचा मंत्रीमंडळात समावेश करावा अथवा त्यांना महामंडळावर नियुक्त करावे अशी जालना जिल्ह्यातील रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाच्या बैठकीत मागणी केली असून तसा ठरावही घेण्यात आलाय.
दि. 10 जुलै 2022 रोजी दुपारी 1 वाजता अ‍ॅड. ब्रम्हाणंद चव्हाण यांच्या निवासस्थानी जिल्हाध्यक्ष गणेशराव रत्नपारखे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या मागणीसाठी सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री खा. रामदास आठवले यांची भेट घेण्यासाठी मुंबई येथे एक शिष्ठमंडळ जाणार असून त्यांच्याकडे ही मागणी केली जाणार आहे.
तसेच आगामी नगर पालीका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीतही रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाला जागा सोडाव्यात अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. नगर पालीका निवडणूकीत मित्रपक्षाकडून रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाला जागा सोडाव्यात यासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. संतोष दानवे यांची भेट घेणार असून जागा सोडून घेण्यासाठी चर्चा करणार असल्याचे रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाच्या बैठकीत ठरले.

जालना पालीकसाठी 7 तर इतर सर्व पालीकेत प्रत्येकी 3 जागेची मागणी करण्यात येणार आहे. तसेच आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत 8 जागा तर पंचायत समितीसाठी प्रत्येक तालुक्यात 2 या प्रमाणे जिल्ह्यात 16 जागा या पंचायत समितीसाठी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाला सोडाव्यात अशीही मागणी या बैठकीत करण्यात आली आहे.
या बैठकीस रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाचे मराठवाडा अध्यक्ष अ‍ॅड. ब्रम्हाणंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष गणेश रत्नपारखे, सुधाकर रत्नपारखे, बबन रत्नपारखे, महेंद्र रत्नपारखे, राजेंद्र साबळे, सिध्दार्थ चव्हाण, विजय खरात, अनिल खिल्लारे, राहुल आदमाने, सुनिल कांबळे, गोवर्धन साबळे, अर्जुन गाढे, मधुकर बोबडे, स्वप्नील गायकवाड, अमोल रत्नपारखे, प्रमोद भुतकतर, राजेंद्र भिंगारदिवे, सचिन मोकळे, रमेश धांडे यांची उपस्थिती होती.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *