ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आदित्य ठाकरे आज कर्जत मध्ये;  शिवसेनेत सन्नाटा पण राष्ट्रवादीची बॅनरबाजी शिवसैनिक संभ्रमात

June 28, 202213:03 PM 21 0 0

खालापूर (कु. अदिती पवार) : सेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बंडा नंतर आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कर्जत मध्ये सभा घेत आहेत. पण शिवसैनिकांना त्याच काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसत असून ठाकरेंच्या स्वागतास राष्ट्रवादी कडून बॅनर प्रथमच झळकले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी चे माजी आमदार सुरेश लाड सक्रिय झाल्याने सेनेच्या गोटात मोठा संभ्रम निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे.अनेक शिवसेना पदाधिकारी या सभेवर अघोषित बहिष्कार टाकणार असल्याचं समजते आहे.

आदित्य ठाकरे यांची आज सभा कर्जत मध्ये होत आहे.अर्थातच विषय आमदारांच्या बंडाचा आहे.कर्जत व खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या बंडा नंतर त्यांच्या विरोधात मतदार संघात कोठे आंदोलन सोडा पण साधा निषेध ही कोणी नोंदवला नाही. व्हाट्सएपच्या माध्यमातून फक्त अनेकांनी काय प्रतिक्रिया दिल्या असतील तेवढंच. आदित्य ठाकरे मतदार संघात येत आहेत म्हंटल्यावर दोन्ही तालुक्यात त्यांच्या स्वागताचे बॅनर लागणे अपेक्षित होते जे की या पूर्वी पहावयास मिळाले आहे पण कर्जत फाट्यावर एक निनावी बॅनर सोडला तर सर्वत्र शुकशुकाट. अश्यातच राष्ट्रवादी चे माजी आमदार सुरेशभाऊ लाड यांचा बॅनर पहावयास मिळत आहे. सोशल मीडियावर देखील सुरेश लाड यांचे मंत्री आदित्य ठाकरे यांचे स्वागताचे बॅनर फिरत आहेत. राष्ट्रवादी च्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुरेश लाड शांत होते.आणि आज ते सक्रिय झाल्याचे दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 2019 ला सुरेश लाड सेनेत जाणार अश्या चर्चा होत्या पण त्यावेळेस तसे झाले नाही. महेंद्र थोरवे ना सेनेने तिकीट दिल्यानंतर सुरेश लाडांनी राष्ट्रवादी मधून त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला होता.तेव्हा पासून च या दोन आजीमाजी आमदारांचं कट्टर वैर सर्वानी पाहिलं आहे.महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरेशभाऊ लाड यांनी आदित्य ठाकरे साठी केलेली बॅनर बाजी तसे बरेच काही सांगून जात आहे. आणि तसाच काहीसा विचार कर्जत खालापुरातील शिवसैनिक आज करताना दिसत आहेत.

आदित्य ठाकरे यांची ही सभा कश्यासाठी आहे हे सर्वश्रुत असताना सेनेचे बरेच पदाधिकारी व शिवसैनिक त्याकडे पाठ फिरवतील असे खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून समजत असून शिवसैनिकांच्या दूविधा मनःस्थितीचा सुरेश लाड राजकीय फायदा तर घेत नाहीत ना असे बोलले जात आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *