जालना ( प्रतिनिधी) : सर्वसमावेशक सक्षम ,नेतृत्व असलेले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षभरात कोरोना संकटाचा सामना करण्या सोबतच सर्व घटकांना न्याय मिळेल असा लोककल्याणकारी राज्यकारभार चालविला असून त्यांच्या समन्यायी राज्य कारभाराने प्रभावित होत उपेक्षित घटकांना शिवसेना हाच आपल्या प्रगतीसाठी एकमेव आशेचा किरण दिसत आहे. असे प्रतिपादन शिवसेना नेते ,माजी मंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी आज येथे बोलताना केले. काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी रविवारी ( ता. १३) शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. दर्शना या निवासस्थानी झालेल्या प्रवेश सोहळ्यास युवा सेनेचे राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर ,ॲड अशपाक पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
अर्जुनराव खोतकर पुढे म्हणाले, दहातोंडे असलेले केंद्र सरकार शेतकरी ,कामगार व सर्वसामान्यांच्या विरोधात असून या राज्यकर्त्यांना सर्वसामान्यांच्या सुखदुःखाशी काही देणेघेणे नाही. अशी टीका त्यांनी केली. सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी आपल्या न्याय हक्कासाठी भांडणाऱ्या बळीराजांवर हे सरकार अमानुष अत्याचार करत असून या दडपशाही विरोधात खंबीरपणे लढा देण्यासाठी उपेक्षित घटकांना शिवसेना हाच पर्याय दिसत असल्याने शिवसेनेत प्रवेशांचा लोंढा वाढत आहे. नव्याने प्रवेश करणाऱ्या युवकांचा पक्षात योग्य सन्मान केला जाईल . असेही अर्जुनराव खोतकर यांनी स्पष्ट केले.
युवासेना राज्य विस्तारक अभिमन्यू खोतकर यांनी ज्या राज्यांत भाजपची सत्ता नाही अशा राज्यांना केंद्र सरकार कडून मिळत असलेल्या सापत्न वागणुकीबद्दल तीव्र रोष प्रकट केला. तसेच शिक्षण, रोजगार या तरुणांच्या समस्या सोडविण्यासाठी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वार्थाने प्रयत्न केले जातील. असा विश्वास अभिमन्यू खोतकर यांनी यावेळी दिला.
सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड अशपाक पठाण यांनी केले. या वेळी मोसिन खान ,सोहेल खान, जावेद खान ,मेहमूद खान ,अबरार तांबोळी, नजीर पैलवान ,आकेत बागवान, पवन साबळे, गणेश साबळे, संतोष मगर, गिड्डु मौली, इरफान मौली,नबीब खान ,दानिश बागवान ,अतार बागवान, अन्वर मणियार, इबात बागवान शेख अन्वर, रज्जाक बागवान , रईस रहमान ,वसीम शेख, इमरान खान ,रईस बागवान ,अजहर अहमद, मिनाज खान ,सादत खान, अमन खान ,शेख शोएब ,अोमर बागवान, आकाश माने, ताजु बागवान, शेख समीर, आदिल शेख, विजय कदम, सादेक खान, अन्वर खान, जुनेद खान, नावेद खान ,शेर खान यांच्यासह असंख्य युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यांचे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर आणि अभिमन्यू खोतकर यांनी स्वागत केले.
Leave a Reply