उरण (संगिता पवार) : कौशल्य विकास विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्ष व प्रशिक्षण प्रवेश २०१२ औधोगिक प्रशिक्षण संस्था उरण येथे प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे ,उमेदवारांनी औधोगिक प्रशिक्षण संस्था (आय .टी .आय .)उरण ,दाउर नगर ,एस टी .डेपो समोर संपर्क साधावे अथवाओंन लाईन अर्ज करावेत असे समन्वयक ए .बी ,वडके यांनी सांगितले .
सन २०२१ या वर्षी व्यवसाय निहाय माहिती दिलेली आहे १ )कोपा ( कॉम्पुटर पोग्रमिंग असिस्टट – कालावधी एक वर्षे ,१० उतीर्ण ,२ )सांधता (वेल्डर ) – कालावधी एक वर्ष ,१० अनु उतीर्ण, ३ )यांत्रिक प्रशिक्षण व वातानुकुलीत – कालावधी २ वर्षे १० वी उतीर्ण , ४ ) फिटर – कालावधी २ वर्षे १० उतीर्ण , ५)यंत्रकारागीर – कालावधी २ वर्षे १० वी उतीर्ण ,६ ) कातारी – कालावधी -२ वर्षे १० वी उतीर्ण ,७ )वीजतंत्री — कालावधी २ वर्षे १० वी उतीर्ण , ८ ) तारतंत्री – कालावधी २ वर्षे १० वी उतीर्ण , किंवा अनुउतीर्ण चालेल .अश्या प्रकारे यावर्षी प्रशिक्षण प्रवेश दिला जाणार आहे .
सर्व प्रवेश प्रक्रिया ऑन लाईन पद्धतीने होईल प्रवेश प्रक्रिया माहितीसाठी http://admission.dvet.gov.in या वेबसाईट वर भेट द्यावी . अधिक माहिती साठी जिल्हा समन्वयक ए .बी ,वडके मोबईल -९८७०९४९२४७ -जिल्हा समन्वयक आर डी .राऊत मोबईल -९७६६०७७५०३ यांच्या शी संपर्क साधावा .
Leave a Reply