जालना ( प्रतिनिधी) : जालना शहरातील रहदारी च्या दृष्टीने ज्वलंत समस्या बनलेल्या मूर्ती वेस चा तिढा पंधरा दिवसांत सोडविण्याबाबत पालकमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी ( ता. 03) प्रशासनास निर्देश दिले आहेत. अशी माहिती ॲड .महेश धन्नावत यांनी दिली. धोकादायक बनलेल्या मुर्ती वेशीतून अनेक दिवसांपासून वाहतूक बंद आहे.जालनेकरांसाठी जिव्हाळ्याची बनलेली समस्या सोडवण्यासाठी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष ॲड. महेश धन्नावत हे नगर परिषद, जिल्हाधिकारी ते थेट विभागीय आयुक्तांकडे आयुक्त कार्यालया पर्यंत पाठपुरावा करत असून यासंदर्भात त्यांनी वेळोवेळी निवेदने ही दिली आहेत.
आज पालकमंत्री राजेश टोपे यांच्या निवासस्थानी जाऊन ॲड. महेश धन्नावत यांनी मूर्ती वेस चा प्रश्न तातडीने निकाली काढण्याबाबत सविस्तर लेखी निवेदन देत शहरवासीयांच्या गंभीर समस्यांकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. नवीन व जुना जालन्यास जोडणाऱ्या प्रमुख मार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने शहरवासीयांची होणारी फरफट, मंगळ बाजारात व्यवसायासाठी येणाऱ्या व्यावसायिकांची होणारी हाल अपेष्टा, रूगवाहिकां सोबत वाहनधारकांना करावी लागणारी तारेवरची कसरत. अशा ज्वलंत समस्या ॲड. महेश धन्नावत यांनी पालकमंत्री राजेश टोपे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. पालकमंत्र्यांनी त्या समजून घेत आपण आ.कैलास गोरंट्याल ,नगराध्यक्षा सौ संगीता ताई गोरंट्याल,यांच्या शी चर्चा करून जिल्हा व नगर परिषद प्रशासनास पंधरा दिवसांत मुर्ती वेस चा प्रश्न निकाली काढण्याबाबत निर्देशीत करणार असल्याचे ना. राजेश टोपे यांनी सांगितले. अशी माहिती ॲड. महेश धन्नावत यांनी दिली. या वेळी लोकनेते गोपीनाथराव मुंढे संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक ॲड. संजय काळबांडे उपस्थित होते.
Leave a Reply