ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

‘कलम 370’ नंतर केंद्र सरकारने काश्मिरी हिंदूंच्या पुर्नवसनासाठी ठोस पावले उचलावीत ! – श्री. राहुल कौल, राष्ट्रीय संयोजक, यूथ फॉर पनून काश्मीर

July 9, 202112:30 PM 53 0 0

काश्मिरी हिंदूंनी गेल्या 32 वर्षांत धार्मिक नरसंहाराचा सामना केला आहे. या नरसंहाराकडे आताची राजकीय प्रणालीही दुर्लक्ष करत आहे. ज्या ‘जिहाद’मुळे काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झाला, त्याची पाळेमुळे संपूर्ण देशभर आता पसरत आहे. या ‘जिहाद’च्या मुळावर जोपर्यंत आपण प्रहार करणार नाही, तोपर्यंत त्याच्या शाखा देशभर विस्तार करतच रहातील. वर्तमान सरकारने काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला ‘धार्मिक नरसंहार’ घोषित करायला हवे. काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता विस्थापित काश्मिरी हिंदूंना त्यांच्या भूमीत आणता येणार नाही. केंद्र सरकारने काश्मीरमधून ‘कलम 370’ जरी हटवले असले, तरी काश्मिरी हिंदूंच्या पुर्नवसनासाठी ठोस पावले उचलावीत, असे प्रतिपादन ‘यूथ फॉर पनून काश्मीर’चे राष्ट्रीय संयोजक श्री. राहुल कौल यांनी केले. हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘भारतात हिंदूंचे विस्थापन – कारण आणि उपाय ?’ या विशेष संवादात ते बोलत होते. हा कार्यक्रम समितीच्या Hindujagruti.org या संकेतस्थळाद्वारे, तसेच यू-ट्यूब आणि ट्विटर यांद्वारे 2,173 लोकांनी प्रत्यक्ष पाहिला.

या वेळी ‘विश्‍व हिंदू परिषदे’चे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. विनोद बंसल म्हणाले, भारत का जगातील एकमेव असा देश आहे की जिथे बहुसंख्याक समाज अल्पसंख्याक समाजाकडून अत्याचाराची शिकार बनत आहे. मेवात (हरियाणा) येथील हिंदूंचे पलायन झाल्यानंतर ‘आम्ही मेवातच्या स्थितीला बदलू’, असे त्या वेळी तेथील मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिले होते; मात्र दुर्दैवाने तेथील स्थितीमध्ये विशेष पालट झाला नाही. फक्त मेवातच नव्हे, तर संपूर्ण भारतामध्ये अनेक शहरे, जिल्हे असे आहेत, जे आता खंडीत होत आहेत. आपला स्वाभिमान, राष्ट्र आणि धर्म याचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक हिंदू व्यक्ती स्वत:चे दायित्व मानून कृती करणार नाही, तोपर्यंत या समस्यांचे निराकरण होणे कठीण आहे. यासाठी जागृत राहून लढणे आवश्यक आहे.

या वेळी ‘भारत रक्षा मंच’चे राष्ट्रीय महासचिव श्री. अनिल धीर म्हणाले, ‘यंदा 2021 च्या जनगणनेत सर्व समुदायांच्या लोकसंख्येचे चित्र स्पष्ट होईलच; मात्र आज देशात ‘जनसंख्या नियंत्रण कायदा’ येण्याची नितांत आवश्यकता आहे. हल्लीच्या बंगालमधील निवडणूका, तसेच त्यानंतर झालेला हिंसाचार यांमुळे हिंदूंनी जीवाच्या भीतीने पलायन केले आहे. केंद्र सरकारने याविषयी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. हिंदूंचे पलायन का होत आहे, याची कारणे शोधून उपाय काढणे गरजेचे आहे. भारताने अन्य देशांकडून शिकून ही समस्या सोडविण्यासाठी कायदे आणि उपाय काढावेत.’ या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की, आज हिंदूंच्या पलायनासोबत हिंदूंची मंदिरे नष्ट करणे, स्त्रियांवरील अत्याचार अशा अनेक गोष्टी देशभर घडत आहेत. देशातील सीमावर्ती भागातच नव्हे, तर देशात अनेक ठिकाणी ‘लॅण्ड जिहाद’मुळे हिंदूंना जबरदस्तीने पलायन करण्यास भाग पाडले जात आहे. देशाच्या सुरक्षेसाठी हा मोठा धोका आहे. देशात ठिकठिकाणी ‘मिनी पाकिस्तान’ होऊ नयेत, यासाठी हिंदूंनी सतर्क राहण्याची गरज आहे. काश्मिरी हिंदूंचेच नव्हे, तर देशभरातील सर्वच निष्कासित हिंदूंचे पुर्नवसन व्हायला हवे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *