ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर भय्यासाहेब आंबेडकरच खरा परिवर्तनवादी खंबीर नेता होते- ऍड. कैलास रत्नपारखी

September 19, 202112:49 PM 14 0 0

जालना – डॉ बाबासाहेब यांचे पुत्र सुर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण नंतर डॉ बाबासाहेब यांची सामाजिक,धार्मिक परिवर्तनवादी चळवळ पुढे नेण्यासाठी मोठे योगदान दिले बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव भिमराव आंबेडकरच आंबेडकरी चळवळीचे खरे नेते होते . असे ,वंचित चे जिल्हा प्रवक्ता ऍड कैलास रत्नपारखी यांनी आद. भय्यासाहेब आंबेडकर यांच्या 44 व्या स्मृती दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा , जालना शहर शाखेच्या वतीने आयोजित मस्तगड येथील अभिवादन कार्यक्रमात बोलताना सांगितले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जालना शहराध्यक्ष नितीन उन्हाळे ,भारतीय बौद्ध महासभेचे जालना जिल्हाध्यक्ष महेंद्र बनकर,जिल्हा संस्कार उपाध्यक्ष कुणाल दहिवले, जिल्हा संगटक प्रशिक सम्राट, वंचितचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके, जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, प्रमुख वक्ते तथा जिल्हा प्रवक्ते ऍड कैलास रत्नपारखी, शहराध्यक्ष कैलास रत्नपारखे, गौतम वाघमारे,कैलास जाधव,मुरली बोबडे,कैलास बनसोडे, संस्थेचे सम्राट नगर शाखा अध्यक्ष अर्जुन म्हस्के यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

 
यावेळी पुढे बोलताना रत्नपारखी म्हणाले की आद. भय्यासाहेब यांची विधान परिषदेवर निवड झाली त्यावेळी दि.24/7/1960 रोजीच्या सत्कार कार्यक्रमात माझा सत्कार करण्याऐवजी बाबासाहेबांच्या संघटना बळकट करा असे भय्यासाहेब बोलल्याचा संदर्भ देऊन भय्यासाहेब हे बाबासाहेबांचे खरे अनुयायी होते असे त्यांनी सांगितले. तसेच आंबेडकरी चळवळ ही लोखंडाचे चणे पचविणारी चळवळ आहे असे भय्यासाहेब यांनी भागवत जाधव आणि रमेश देवरुखकर यांच्या दि.11/1/2077 रोजीच्या श्रद्धांजली सभेत सांगितले होते. डॉ बाबासाहेबांच्या महापरनिर्वाणानंतर दिल्लीतील घरी गेल्यावर भय्यासाहब यांच्यावर बाबासाहेबांच्या म्हणजे स्वतः च्या बापाच्याच घरात चोरी केल्याचा आरोप करून त्यांना कोर्टात उभे केल्याचे पातक दिल्लीत केले होते. एवढेच काय राजगृह ची कोर्टाने ठरवून दिलेली अर्धी किंमत (एक लाख ऐशी हजार ) देऊन विकत घ्यावे लागल्याचे रत्नपारखी यांनी सांगितले. त्यासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या लोकांनी कर्जाऊ पैसे सुद्धा दिले नाही व राजगृहचा ताबाही दिला याची कथाही सांगितली. भय्यासाहेब यांना लोकांनी मदत/ सहकार्य करायच्या ऐवजी त्रास दिला व बदनामच केले. त्यांची चांगली बाजू सांगितली गेली नाही अशी खंत व्यक्त केली. डॉ बाबासाहेबांच्या चैत्य भूमी साठी लोकांनी स्टेट बँकेत रांगा लावून तीन नेत्यांच्या नावे पैसे भरले परंतु ते चैत्य भूमी साठी वापरले नाही शेवटी भय्यासाहेब यांनीच महू ते चैत्यभूमी भिमज्योत काढून निधी गोळा करून आजची चैत्यभूमी बांधली आहे. भय्यासाहेबांचा जन्म, शिक्षण,आजारपण, जनता व प्रबुद्ध भारत च्या माध्यमातून पत्रकारिता, डॉ.बाबासाहेब यांच्या महापरिनिर्वाण कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संस्कार उपाध्यक्ष कुणाल दहिवले गुरुजी यांनी केले तर प्रास्ताविक शहराध्यक्ष नितीन उन्हाळे यांनी केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *