ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

पाच वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर म्हणाला, ‘मला भूताने झपाटलं होतं’

February 2, 202113:46 PM 61 0 0

पाच वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या विकृताला मुंबईमधील विशेष पॉस्को न्यायालयाने अद्दल घडवली असून १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ५८ वर्षीय आरोपीने २०१८ मध्ये शेजारी राहणाऱ्या पीडित मुलाचे कपडे काढून त्याच्या गुप्तांगाला स्पर्श केला होता, तसंच हस्तमैथूनही केलं होतं. पाच मुलांचा वडील असणाऱ्या आरोपीला शिक्षा सुनावताना न्यायालयाने मुलाच्या शरिराला कोणत्याही चुकीच्या प्रकारे स्पर्श करणं गुन्हा असल्याचं स्पष्ट केलं.

हे प्रकरण ४ एप्रिल २०१८ मधील आहे. घराबाहेर खेळणारा पाच वर्षीय पीडित मुलगा आपल्या घरी धावत गेला होता. मुलगा घाबरलेला असल्याने आईने त्याला काय झालं अशी विचारणा केली. पण उत्तर देण्याऐवजी तो माळ्यावर पळून गेला. त्याची आई त्याच्यामागून धावत गेली.

काय झालं आहे सांगत नसल्याने आई ओरडल्यानंतर मुलाने झालेला सगळा प्रकार सांगितला. शेजारी राहणाऱ्या मुर्गीवाला चाचाने आपल्याला दोन रुपये दिले आणि सोबत त्याच्या झोपडीत घेऊन गेला. तिथे त्याने आपल्याला झोपायला लावलं आणि नंतर आपली पँट काढून दुष्कर्म केल्याचं मुलाने सांगताच त्याच्या आईला धक्का बसला. तिने थेट आरोपीचं घर गाठलं आणि त्याला याबद्दल विचारणा केली. यावर त्याने, “मला भूताने झपाटलं होतं, कृपया यावेळी माफ करा” असं सांगितलं. महिलेने पतीला घडलेला सगळा प्रकार सांगितल्यानंतर वडाळा टीटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित मुलगा आणि आईसोबतच घऱमालकानेही कोर्टात साक्ष दिली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली तेव्हा घरमालक तिथेच उपस्थित होता.

युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाने सरकारी वकिलांनी पॉस्को कायद्यातील कलम ६ आणि १० अंतर्गत गुन्हा झाल्याचं सिद्ध केलं असल्याचं सांगितलं. दुसरीकडे आरोपीच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला की, “त्याची पत्नी आणि पाच मुली गावी राहतात. तीन मुलींचं लग्न झालं असून त्याच्यावर पत्नी, दोन मुली आणि अंध भावाची जबाबदारी आहे. कुटुंबाची पार्श्वभूमी लक्षात घेताना न्यायालयाने सौम्य भूमिका घ्यावी”. सरकारी वकिलांनी जास्तीत जास्त शिक्षेची मागणी केलेली असताना न्यायालयाने आरोपीची आर्थिक स्थिती कमीत कमी शिक्षा सुनावली आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *