ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

सभापती अर्जुनराव खोतकर यांच्या भेटीनंतर मोसंबीस मिळाला उच्चांकी भाव

September 8, 202113:19 PM 19 0 0

जालना ( प्रतिनिधी) : जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या मोसंबी मार्केटला माजी मंत्री तथा सभापती अर्जुनराव खोतकर यांनी मंगळवारी ( ता. ०७) भेट देताच मोसंबीस चालू वर्षातील सर्वात उच्चांकी भाव मिळाला. श्री. खोतकर यांची भेट लाभदायक ठरल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या मोसंबी मार्केट ची सर्वञ ख्याती आहे.येथे दररोज सरासरी शंभर टन मोसंबीची आवक होते.


येथून कलकत्ता, दिल्ली, उत्तर प्रदेश, जयपूर, सह उत्तर भारतात मोसंबी ची निर्यात मोठ्या प्रमाणावर केली जाते.
सध्या मिरग्या बहार सुरू असून पंधरा दिवसांत तीन हजार टन मोसंबी ची आवक झाली. या पार्श्वभूमीवर सभापती अर्जुनराव खोतकर यांनी आज मोसंबी मार्केट ला भेट देऊन आडते, व्यापारी व मोसंबी उत्पादक शेतकरी यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्या सोडविण्यासह जास्तीत जास्त भाव मिळवून द्यावा .अशा सूचना सभापती अर्जुनराव खोतकर यांनी सचिव रजनीकांत इंगळे यांना केल्या.
दरम्यान सभापती अर्जुनराव खोतकर यांच्या उपस्थितीत झालेल्या लिलावात वडीवाडी येथील शेतकरी प्रभाकर पवार यांच्या मोसंबीस चालू हंगामातील सर्वात उच्चांकी ( 23,500) रू . प्रती टन दराने बोली लावत व्यापारी नाथा पाटील घनघाव यांनी खरेदी केली.
भाजीपाला व मोसंबी मार्केट असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांतर्फे सभापती खोतकर यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी फेरोज लाला तांबोळी , आलम खान, जाफर खान, शमीन, प्रकाश शेळके, नसीर जहागिरदार, हाजी नजीर, मुकेश महाजन,इरफान नजीर, जावेद खान, मोसीन खान, जुल्फेकार खान, बागवान, विष्णू हालगे, राजू पखाले, शेतकरी प्रकाश डिखुळे, गणेश मोहिते, बाजार समिती चे मोहन राठोड, अनिल खंडाळे, वहीद खान, भगवान शिंदे, सुधाकर धोत्रे, हार्दिक फलके,कृष्णा कापरे आदींची उपस्थिती होती.

ग्रेडर सह सुविधांसाठी प्रयत्न : सभापती खोतकर
देशात सर्वाधिक गोड असलेल्या जालन्याच्या मोसंबीस जी. आय. मानांकन प्राप्त झाले आहे.टाळेबंदीत ही आपण मोसंबी आवक आणि निर्यातीत टाळेबंदी असतांना ही खंड पडू दिला नाही. असे सांगून येथे ग्रेडर सह अन्य मुलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न सुरू असून मोसंबी उत्पादकांना जास्तीत जास्त भाव मिळवून देण्यास आपले प्राधान्य असल्याचे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *