ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

उलटी आल्याने मुलीने डोकं बसच्या खिडकीतून बाहेर काढलं आणि तितक्यात वेगाने आलेल्या ट्रकने तिचं मुंडकं उडवलं

March 31, 202112:37 PM 127 0 0

उलटी आल्याने चालत्या बसच्या बाहेर डोकं काढणं एका मुलीच्या जीवावर बेतलं आहे. १३ वर्षीय मुलीने डोकं बाहेर काढताच समोरुन वेगाने आलेल्या ट्रकने तिचं मुंडकं उडवलं. मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तमन्ना आपली आई आणि बहिणीसोबत खांडवा ते इंदोरदरम्यान बसने प्रवास करत होती. तमन्ना चालकाच्या मागील सीटवर बसली होती. सकाळी ८ वाजता प्रवासाला सुरुवात झाली होती. ९.३० वाजण्याच्या सुमारास बस हायवेवर असताना तमन्नाला उलटी होऊ लागली आणि तिने डोकं खिडकीच्या बाहेर काढलं.

त्याचक्षणी समोरुन येणाऱ्या ट्रकने तिला धडक दिली आणि मुंडकं उडवलं. “आम्हाला काय झालं काहीच समजलं नाही. अचानक बसमध्ये आणि आमच्या अंगावर रक्त उडालं. काही सेकंदांनी तिची आई घाबरुन ओरडू लागली. ते भयानक होतं,” अशी माहिती बसमधील प्रवाशाने दिली आहे.

तमन्ना आपल्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी चालली होती असं पोलिसांनी सांगितलं आहे. तमन्नाला मोठी अधिकारी करण्याचं तिच्या वडिलांचं स्वप्न होतं. यासाठी त्यांनी तिला एका चांगल्या शाळेतही घातलं होतं. तमन्नाच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Categories: राष्ट्रीय
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *