जालना ( प्रतिनिधी) : शेतात भरघोस उत्पादन होऊन शेतकरी समृद्ध व्हावा, सोबतच पर्यावरणही राखले जावे. अशी राष्ट्रमाता ,राजमाता, मॉ.जिजाऊ यांची धारणा होती. छत्रपती शिवरायांनी राज्य कारभाराद्वारे ती प्रत्यक्ष साकारली. याच शिव विचारांवर कृषी परिषदेची वाटचाल सुरू आहे. असे प्रतिपादन मराठा सेवा संघ प्रणित कृषी परिषदेचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम चंद पाटील यांनी केले.
स्वराज्य प्रेरिका, राष्ट्रमाता ,राजमाता, मॉ. जिजाऊ यांच्या जयंती निमित्त मराठा सेवा संघ प्रणित कृषी परिषदेच्या वतीने जालना तालुक्यातील बोरखेडी,कडवंची, पिरकल्याण शिवारात शिवार फेरी काढून वृक्षारोपण करण्यात आले.
बोरखेडी शिवारातील योगेश उजवणे यांच्या शेतात राष्ट्रमाता मॉ जिजाऊ यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक जिजाऊ वंदना घेण्यात आली. तुळशीराम चंद पाटील पुढे म्हणाले, जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त मातृतीर्थ येथे मोठ्या जल्लोषात कृषी परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबविले जातात. यंदा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात येतात शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी आगळ्यावेगळ्या पद्धतीने जयंती साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. असे तुळशीराम चंद यांनी नमूद केले . ते पुढे म्हणाले,बदलत्या वातावरणाचा फळबागांना फटका बसत असल्याने अपेक्षित उत्पन्न येत नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी चंदन, महोगणी, जांभळा ची लागवड करून आपले उत्पन्न वाढवावे. सोबतच पर्यावरणाचाही समतोल राखला जाईल .असे तुळशी राम चंद पाटील यांनी सांगितले.
यावेळी सुदामराव जगदाळे, रामेश्वर नरवडे, गणेश नरवडे, अशोक शिरसाट, पंडित चव्हाण ,कैलास राठोड, प्रवीण पवार, योगेश उजवणे, भास्कर साळवे ,सुभाष साळवे, परमेश्वर सातपुते, ज्ञानेश्वर कापसे ,भागवत चव्हाण, संग्राम पाटील, सुभाष राठोड यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती. पर्यावरणास अनुकूल असे महोगणी,जांभूळ,चंदन या वृक्षांची लागवड करण्यात आली शेतकऱ्यांनी या शिवार फेरीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
Leave a Reply