जालना :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरीत क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची 108 वी जयंती निमित्त जिल्हा परिषदेतील सभाग्रहामध्ये कृषि दिन म्हणुन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमास अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद जालनाचे अध्यक्ष उत्तमराव वानखेडे हे होते. या कार्यक्रमासाठी विष्णुपंत गायकवाड, प्रकल्प संचालक डी. आर. डी.ए. श्रीमती कल्पना क्षीरसागर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, जालना जिल्हा परीषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. नामदेव केंद्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, दिगंबर कांबळे, कृषि विकास अधिकारी भिमराव रणदिवे, जिल्हा कृषि अधिकारी श्रीकांत देशपांडे, मोहीम अधिकारी सुधाकर कराड, उपसंचालक आत्मा मगर, कृषि उपसंचालक माईनकर कृषि विभागातील कर्मचारी व प्रगतीशील शेतकरी उपस्थीत होते.
या प्रसंगी कृषि विभागामार्फत राबविण्यात आलेल्या कृषि संजीवन कार्यक्रमाचा समारोप व जिल्हयातील हरभरा व गहु पिक उत्पादनात विक्रमी उत्पादन घेणा-या विभागस्तर, जिल्हास्तर व तालुकास्तर मध्ये निवड झालेल्या पिक स्पर्धा विजेत्यांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत यशस्वी शेतकरी अशा एकुण 17 शेतकऱ्यांना सन्मानपत्र मा. जिल्हा परिषद अध्यक्ष उत्तमराव वानखेडे यांचे हस्ते देण्यात आले. याप्रसंगी उत्तमराव चव्हाण मुख्य लेखा व वित्त अधि कारी जिल्हा परिषद जालना, दिगंबर कांबळे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, बाळासाहेब शिंदे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जालना यांनी कै. वसंतराव नाईक यांचे जीवन कार्याबद्दल माहिती दिली.
कृषि दिनानिमित्त जिल्हा परिषद कृषि विभाग आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत उमेद अभियान अंतर्गत धारकल्याण ता. जालना येथील महिला शेतकरी गटांना 12 मे. टन रासायनिक खताचा बांधावर खत वाटपाचे मान्यवरांचे हस्ते वाहनास हिरवा झेंडा दाखवुन वितरण करण्यात आले. तसेच जिल्हा परीषद आवारात वृक्षारोपण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि विकास अधिकारी जिल्हा परीषद जालना भिमराव रणदिवे, तर आभार प्रदर्शन जिल्हा कृषि अधिकारी जिल्हा परीषद जालना श्रीकांत देशपांडे यांनी केले.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वसंत मदन, क्षीरसागर, बाबुराव पल्लेवाड, रामेश्वर चव्हाण यांनी परीश्रम घेतले.असे कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
Leave a Reply