ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भाचीचा वाढदिवस ठरला त्याचा शेवटचा दिवस, कलोते धरणात आकाश नाईक या तरुणाचा बुडून मृत्यू

June 21, 202216:14 PM 26 0 0

खालापूर  (कु. अदिती पवार) : वाढदिवस साजरा करण्यासाठी खालापुरातील कलोते धरणावर काही पर्यटक रविवारी 19 जून ला आले होते. यातील आकाश नाईक व त्याचे सहकारी पोहण्यासाठी धरणात उतरले पण पाणी खोल असल्याने मधूनच परतत असताना आकाश किनारी पोहचलाच नाही. रविवारी त्याचा धरणात खूप शोध घेतला पण तो मिळून आला नाही शेवटी सोमवारी अपघात ग्रसतांच्या मदतीला संस्थेच्या सदस्यांनी त्याचा मृतदेह खोल पाण्यातून शोधून काढला. कारगाव, कर्नाटक येथील असेलेले आकाश नाईक पुणे येथे कॉल सेन्टर मध्ये कामाला होता,  आकाश नाईकच्या भाचीचा वाढदिवस होता म्हणून त्याचे कुटुंबीय व मित्र मैत्रिणी वाढदिवस साजरा करण्यासाठी खालापुरातील  लोधिवली येथे ओळखीच्या कडे आले होते. ते सर्व लोधीवली च्या रिलायन्स कॉलनी मध्ये आले होते.

पण तिथे एवढ्या लोकांना पार्टी करायला परवानगी नसल्याने कालोते येथे फार्महाऊस ला वाढदिवस पार्टी साजरी करायला आले. तेव्हा मौजमजा करीत असताना त्यातील 4-5 जण आकाशसह पोहायला डॅम मध्ये गेले. पोहत असताना काही अंतरावर खोलगट भाग असल्याने सर्वांनी माघार येण्याचा निर्णय घेतला. तेव्हा माघारी पाण्यातून येताना सर्वात शेवटी असलेला आकाश केव्हा बुडाला त्यांना कळलेच नाही. त्यानंतर मित्र व कुटुंबियांनी डॅम मध्ये शोध घेतला, गावातीलही मदतीला आले. गावाकऱ्यापैकी एकाने अपघातग्रासतांच्या मदतीसाठी टीम चे अमित गुजरे यांना फोन केला. अमित गुजरे यांनी गुरुभाऊ साठीलकर यांना कळविल्यानंतर, खालापूर पोलीस  निरीक्षक विभुते यांना कळविल्यानंतर यंत्रणा कामाला लागली. काल रविवारी शोध मोहीम सुरू झाली पण संध्याकाळी अंधार पडल्यामुळे थांबावली आज सोमवारी सकाळी 6 वा पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली व अवघ्या तीन तासात 30 फूट खोल बुडालेला आकाश नाईक चा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला.

 

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *