खोपोली येथे रायगड जिल्हा महिला उपाध्यक्ष कु.अदिती पवार यांच्या निवास्थानी अखिल गुरव समाज संघटना खोपोली शहर महिलांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष विजय ठोसर, रायगड जिल्हा अध्यक्ष अमोल गुरव, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खंडागळे, जिल्हा युवक उपाध्यक्ष सचिन गुरव, खोपोली शहर अध्यक्ष निलेश गुरव, यांच्या प्रमुख उपस्थितीत खोपोली शहर महीला कार्यकारीणी जिल्हा महिला उपाध्यक्ष कु.अदिती पवार यांनी जाहीर केली.
त्यावेळी जिल्हा अध्यक्ष अमोल गुरव यांनी सर्व नवनिर्वाचित महिला पदाधिकारी,सदस्य यांचे अभिनंदन केले. त्यावेळी त्यांनी समाज संघटीत का असावा ? व त्यात आपली भूमिका काय असली पाहीजे ? येणाऱ्या काळात समाजातील महिला स्वालंबी कश्या होतील त्या साठी काय केले पाहीजे ह्या सर्व विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.प्रदेश युवक अध्यक्ष विजय ठोसर व उपस्थित पदाधिकारी,समाज बांधव ह्यांच्या हस्ते अखिल गुरव समाज संघटना रायगड जिल्हा आरती संग्रहाचे प्रकाश करण्यात आले. बैठकिला उपस्थित असलेल्या सर्वांचे कु.अदिती पवार यांनी आभार व्यक्त केले.अश्या प्रकारे उत्साहात बैठक संपन्न झाली
Leave a Reply