ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने,सहाय्यक कामगार आयुक्त मा.अनिल गुरव साहेब यांचा सत्कार

December 5, 202113:44 PM 73 0 0

कोल्हापूर हिरकणी टीम : कोल्हापूर जिल्ह्यातील सहाय्यक कामगार आयुक्त म्हणून मा.अनिल गुरव साहेब यांनी पदभार स्वीकारले असल्याने,अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ कोल्हापूर जिल्हा शिष्टमंडळामार्फत भारतीय संविधान उद्देशिका व पुष्पगुच्छ देऊन सन्मान व स्वागत करण्यात आले.

त्या प्रसंगी अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ कोल्हापूर जिल्हा संर्पक प्रमुख मा.प्रशांत वाघमारे साहेब, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मा. संजय गुदगे साहेब, सांगली जिल्हाध्यक्ष मा. संजय कांबळे साहेब, कोल्हापूर जिल्हा कोषाध्यक्ष मा.बाळासाहेब कांबळे(दादा), कोल्हापूर शहर अध्यक्ष भारत कोकाटे साहेब, परशुराम सावंत (बापू )सांगली उपस्थित होते. यावेळी कामगार सहाय्यक आयुक्त मा.अनिल गुरव साहेब यांनी श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांचे विविध प्रलंबीत असणारे अर्ज तात्पर्याने निकालात काढून कामगार व त्यांच्या कुटुंबीयाना योग्य न्याय देण्याची हमी दिली.त्याबद्दल अखिल महाराष्ट्र कामगार – कर्मचारी संघ शिष्टमंडळाने आभार मानले

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *