बहिणाबाई तुझ्या ओठी
खुलल्या मधाळ ग ओव्या
देऊन काव्यविश्वास साचा
स्व भाषेत गुंफण्या काव्या
मन वढाय वढाय गाताना
सांगे जीवनातील रंगरूप
सुखदुःख डोंगर ठायीठायी
तरी शब्दही पेरली अमाप
शब्द तुझे सृष्टीप्रेरक असे
गुणगुणतांना आनंदी नित्य
सृष्टी रूपास देऊनिया दृष्टी
कडू गोड अनुभवाचे सत्य
सोप्या भाषेत सांगते संसार
काव्यरूपात सहज रेखाटते
मिळवून शब्दाचे भव्य गारुड
पिढ्यानंपिढ्या कैक घडविते
बैल वारा पक्षी शेतशिवारात
निरीक्षणाची बोले मधुरवानी
कला कसब अंतरी रुजवूनि
सुगरण खोपाविणे शब्दज्ञानी
काव्यमाऊली बहिणाई तुला
मी अर्पिते काव्य अक्षर दुर्वा
तुझ्या पायी माझा शब्दकणा
बहुमोल जीवनात भासे पूर्वा
हात जोडते अंतर्मानातून सदा
माझ्या प्रेरक वंदन माऊलीस
शब्द संसार प्रेरणा सुखदुःखात
शब्ददृष्टी चंद्रकोर वेध जीवनास
सौ माधुरी प्रकाश काळे
वणी जिल्हा यवतमाळ
सदस्य मराठीचे शिलेदार समूह
Leave a Reply