ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मिशन वात्सल्य योजनेच्या माध्यमातुन महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व विभागांनी संवेदनशिलपणे काम करावे – जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड

December 22, 202113:47 PM 47 0 0

जालना  :- कोव्हीड-19 या महामारीमध्ये घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन विधवा झालेल्या महिलांना मिशन वात्सल्य योजनेच्या माध्यमातुन शासनाच्या‍ विविध योजनांचा लाभ देण्यासाठी सर्व विभागांनी संवेदनशिलपणे व गतीने काम करण्याच्या सुचना करत या महिलांना लाभ देण्यात जे तालुके मागे आहेत त्या तालुक्यातील प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कृतीदलाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्रीमती एस.डी. लोंढे, जिल्हा माहिला व बालकल्याण अधिकारी श्रीमती आर.एन. चिमंद्रे, सहाय्यक आयुक्त कौशल्य विभाग संपत चाटे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. मनोहर बन्सल, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी गजानन इंगळे, चाईल्ड लाईनचे व्यवस्थापक एम.आर. हिवाळे,एस.जी. कुलकर्णी, एस.बी. चव्हाण किरण बिलोरे, एस.एम. लंके, एम.एस. तांबे, पी.जे. गवारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी डॉ. राठोड म्हणाले, घरातील कर्त्या पुरुषाच्या निधनामुळे विधवा झालेल्या महिलांचे पुनर्वसन होण्याच्यादृष्टीने शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातुन चोवीस योंजनांचा लाभ देण्याबाबत यापूर्वीच्या बैठकांमधुनही सुचना देण्यात आल्या होत्या. परंतु काही तालुक्यातील काम हे असमाधानकारक असुन या महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवुन देण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात यावेत. दर आठवड्याला याबाबत तालुकास्तरावर बैठक आयोजित होईल, यादृष्टीने नियोजन करण्याबरोबरच कोरोनामुळे विधवा झालेली एकही पात्र महिला शासनाच्या योजनेपासुन वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
महिला व बालकल्याण विभागातील योजनांचा घेतला आढावा
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या बेटी बचाओ, बेटी पढाओ, माझी कन्या भाग्यश्री, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, बालविवाह निर्मूलन यासह ईतर योजनांचाही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी आढावा घेतला.
जालना जिल्हा बालविवाहमुक्त होण्यासाठी बालविवाह मुक्त गाव संकल्पना राबविण्याच्या सुचना करत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करुन जिल्ह्यातील अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *