ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

जिल्हातील चारही नगरपंचायतीच्या आगामी निवडणुका स्वतत्रंपणे लढविणार :राजाभाऊ देशमुख

December 29, 202021:27 PM 118 0 0

जालना (प्रतिनिधी) जालना जिल्ह्यातील चारही नगरपंचायतीच्या निवडणुका कॉग्रेंस पक्षाने स्वत्रपणे लढवाव्यात असा निर्णय जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या सोमवारी रोजी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीच्या वतीने कॉग्रेस पक्षाच्या 136 व्या स्थांपना दिवस सोमवारी रोजी येथील भगवानसेवा मंगलकार्यलय जुना जालना येथे साजरा करण्यात आला. याकार्यक्रमाच्या अध्यस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे होते. या प्रसंगी प्रदेश कॉग्रेस चे पदाधिकारी डॉ. संजय लाखे पाटील, कल्याणराव दळे, विजय कमड, संत्सग मुंढे, माजी जिल्हध्यक्ष आर. आर. खडके, पक्षनिरीक्षक अ‍ॅड. अनंतराव वानखेडे, अशोकराव पडघन, जिल्हाकार्यध्यक्ष राजेद्रं राख, शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख मेहूमद, प्रभाकर पवार, राम सांवत, एकबाल कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रारंभी कॉग्रेस पक्षाच्या 136 व्या स्थांपना दिवस निमित्ताने जिल्हाध्यक्ष श्री देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी बैठकीच्या सुरुवातीला जिल्हातील बदनापुर, जाफ्राबाद, मंठा आणि घनसांवगी नगरपंचायत निवडणुका संदर्भात तालुकाध्यक्ष निळकंठ वायाळ, अण्णासाहेब खंदारे, सुरेश गवळी, विष्णु कंटोले, लक्ष्मण म्हसलेकर, शेख अनवर, जिल्हा महिला कॉग्रेसच्या अध्यक्षा विमलताई आगलावे यांनी चारही नगरपंचातीच्या बद्दल आपल्या भाषणातुन संपुर्ण माहिती देतांना सांगितले की, कॉगे्रस पक्ष तळागळात पोहचविण्यासाठी नगरपंचायतीच्या निवडणुका कॉग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात जिल्हात चारही ठिकाणी कॉग्रेस पक्षाची भरभक्कम स्थिती आहे. आणि सामन्यकार्यकर्त्यांना उमेदावारी देतांना न्यायाची भुमीका होईल.बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरुन बोलतांना जिल्हाध्यक्ष श्री. देशमुख म्हणाले की, काँग्रेस पक्षाच्या 136 व्या स्थांपना दिवस आहे. पक्षाचे हे गौरवशाली वर्षे आहे, कार्यर्त्यांच्या भावना लक्षात घेता आगामी नगर पंचायतीच्या निवडवणुका कॉग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढवले अशी घोषणा श्री. देशमुख यांनी केली. आमदार राजेश राठोड यांनी बोलतांना म्हणाले की, कार्यर्त्यांनी कॉग्रेसपक्षाच्या गौरवशाली आणि बळीदानाच्या इतिहास सातत्याने आपल्या स्मरणात ठेवल्यास कॉगे्रसचा कार्यकर्ता हा कधीच निराश राहणार नाही. जिल्हातील चारही नगरपंचायत निवडणुकीत कॉग्रेस पक्ष पुर्ण ताकदीने मैदानात उतरले असे श्री. राठोड यांनी सांगुन मंठा नगर पंचायतच्या 17 जागा जिकल्या शिवाय राहणार नाही. अशी गवाही त्यांनी यावेळी दिली.
या प्रसंगी केली.कार्यक्रमाचे प्रस्ताविक करतांना जिल्हाकार्याध्यक्ष राजेद्र राख म्हणाले की, काँग्रेसपक्षाचा गौरवशाली इतिहास पाहता कार्यकर्त्यांनी जिल्हामध्ये काँग्रेसपक्षाला मंजबुत करण्यासाठी आपला अमुल्य वेळ आणि जनसेवेकडे अधिक लक्ष द्यावे आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत चारही ठिकाणी कॉग्रेस पक्षाच्या झेंडा रोवण्यासाठी सज्ज व्हावे. या बैठकीत राजेश काळे, विठ्ठलसिंग राजपुत, आनंद लोखंडे, गुरुमित सिंग सेना, राजेद्र जैस्वाल, चंद्राताई भांगडीया, सुष्माताई पायगव्हाणे, मगंलताई खाडेभराड, चंदाकांत रत्नपारखे, डॉ. विशाल धानुरे, किसन जेठे, फकीरा वाघ, अशोक उबाळे, राजु पवार, संतोष अन्नदाते, भाऊसाहेब सोळुके, शरद देशमुख, मोबिन खान, शिवाजी वाघ, शिवराज जावध, वैभव उगले, सुरेश बोरुडे, जहिरयार खान, जुनेद खान, जावेद कुरेशी, अनस चाउस, शबाब कुरेशी, कयुम कुरेशी आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसचलन शहर कॉग्रेस अध्यक्ष शेख मेहमूद यांनी केले. तर जिल्हासरचिटणिस राम सांवत यांनी आभार मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *