ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

मराठा आरक्षणासाठी सर्व आजी, माजी, मंत्री, आमदार एकवटले मराठा समाजाचे प्रश्न् सोडविण्यासाठी कटीबध्द्-पालकमंत्री राजेश टोपे

February 6, 202114:03 PM 70 0 0

जालना दि. 05 :- मराठा सामाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी साष्टेपिंपळगावांत सुरु असलेले अंदोलनाच्या समर्थनात जालना जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पाठींबा दर्शविण्यासाठी लक्षवेधी ठिय्या अंदोलन करण्यात आले. आज दि. 5 फेब्रुवारी 2021 रोजी जिल्हाअधिकारी कार्यालय जालना येथे सकाळी 11 वाजता ठिय्या अंदोलन सुरु करण्यात आले. या अंदोलनात मराठा समाजाचे जेष्ठ्, युवक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठिय्या अंदोलनाप्रसंगी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे! साष्टपिंपळगावांस जाहिर पाठींबा! जाहिर पाठींबा!, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे आदि घोषणांनी परिसर दणाणुन गेला होता. या ठिय्या अंदोलनास जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, माजीमंत्री अर्जुनराव खोतकर, माजी मंत्री बबनराव लोणीकर, आमदार कैलासजी गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, माजी आमदार संतोष सांबरे, जालना नगराध्यक्षा सौ. संगिताताई गोरंट्याल आदि मान्यवरांनी ठिय्या अंदोलन स्थळी भेट देऊन जाहिर पाठींबा दर्शविला.

पालकमंत्री राजेश टोपे यांनी मराठा समाजाला पाठींबा दर्शवित मराठा समाजाचे विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रश्न् सोडविण्यासा आपण कटीबध्द् असल्याचे सांगत साष्टपिंपळगांव येथे सुरु असलेल्या अंदोलन ठिकाणी मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष ना. अशोकराव चव्हाण यांच्याशी चर्चा करुन त्यांना साष्टपिंपळगांव येथील अंदोलकांच्या मराठा समाजाविषयी असलेल्या मागण्या ऐकुण घेण्या संदर्भात साष्टपिंपळगांव येथे घेऊन येतो असे अश्वासन या प्रसंगी बोलतांना दिले.

तर, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी मराठा समाजाचे आरक्षण तांत्रिक अडचणीमुळे न्यायालयात प्रलंबित असल्याने उशिर होत असल्यामुळे आपण शासनास मराठा आरक्षणाची भक्कम बाजु न्यायालयात मांडण्यासाठी मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्यासोबत चर्चा करुन प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी दिली.

तसेच, माजी मंत्री बबनराव लोणीकर हे बोलतांना म्हणाले की, मराठा आरक्षण प्रश्न् मार्गी लावण्यासाठी विधानसभेत प्रश्न् उपस्थित करुन शासनाला धाऱ्यावर धरु व मराठा सामाजाला न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न् करणार असल्याचे मत व्यक्त् केले. तर जालना विधान सभेचे आमदार कैलासजी गोरंट्याल यांनी ठिय्या आंदोलनाला पाठींबा दर्शवित मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा घडवुन आणत साष्टपिंपळगांव येथील अंदोलन थांबविण्यासाठी प्रयत्न् करणार असल्याचे सांगितले. जाफ्राबाद भोकरदन विधानसभेचे आमदार संतोष दानवे यांनी मत व्यक्त् करतांना सांगितले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपण विधान सभेत शासनावर दबाव गट तयार करुन मराठा आरक्षण प्रश्न् मार्गी लावु असे म्हणाले.

बदनापुर विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांनी ठिय्या अंदोलनास पाठींबा देत त्यांच्या बदनापुर विधानसभेच्या प्रत्येक गा्रमपंचायत ठिकाणी साष्टपिंपळगावांस पाठींबा दर्शविण्यासाठी एक दिवसीय लाक्षणीक ठिय्या अंदोलन करणार असल्याचे सांगितले. ठिय्या अंदोलना प्रसंगी मराठा क्रांती मोर्चा जिल्हा जालनाचे समन्व्यक राजेशजी राऊत, विष्णुभाऊ पाचफुले, सतिश देशमुख, जगन्नाथ काकडे, अरविंद देशमुख, ज्ञानेश्वर ढोबळे, अशोक पडुळ जयंत भोसले, महेश निकम, संजय देठे, रविंद्र जगदाळे, विजय वाढेकर, भरत मानकर, नरसिंह पवार, शैलेश देशमुख, शुभम टेकाळे, संतोष कऱ्हाळे, धर्मराज बनकर, दिलीप तळेकर, दत्ता धांडे, अविनाश कवळे, प्रशांत म्हस्के, संतोष ढेंगळे, आकाश ढेंगळे, सुभाष चव्हाण, करण जाधव, चंद्रकांत भोसले, डॉ. भास्कर राऊत, सोमनाथ गायकवाड, नारायण गजर, योगेशभोरे, किरण देशमुख, विष्ण पिवळ, संतोष चाळसे, कृष्णा पडोळ, मनोहर सुळसुळे, सतिष बाभळे, राजेश कळकुंबे, मिलींद गंगाधरे, शाम जाधव, जितेंद्र मुटकुळे, प्रतिक पवार, श्रीनिवास वाकोडे, संजय देशमुख, धनंजय पोहेकर, कैलास सरकटे, तुकाराम भुतेकर, विकास कदम, विनोद दळवी, प्रविण पडोळ, संदीप कडले, विक्रम गाढे, प्रल्हांद देठे, कमलेश काथोटे, राजेश बावस्कर, रामचंद्र मदन, तुकाराम भुतेकर, संदिप भोसले, कैलास ढमाळे आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सुत्रसंचालन ज्ञानेश्वर ढोबळे यांनी तर आभार प्रदर्शन विष्णुभाऊ पाचफुले यांनी मानले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *