जालना (प्रतिनिधी )कोरोना काळात देशभरासह राज्यातील नागरीकांचा रोजगार, व्यवसाय हिरावल्या गेलया, तसेच अवेळी झालेल्या अतीवृष्टीमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला. यामुळे महागाई वाढली आहे. तसेच अतीवृष्टीमुळे उत्पन्नाला कमी भाव मिळत असल्या कारणाने शेतकरी, नागरीक त्रस्त असतांना राज्य सरकारने विजबिल वसुंली मोहिम सक्तीची केली हे कमी होते की, काय शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्यासाठी विजबिलात वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
हे सरकार शेतकरी, जनहिताचे निर्णय घेण्याऐवजी त्यांच्या समस्या वाढवणे आणि शेतकऱ्यांना मरणाच्या दारात नरेण्याचे काम करत असल्याचे दिसते. तसेच हे निवेदन अधिक्षक अभियंता मार्फत जिल्हाधिकारी, मा.मुख्यमंत्री, मा. उर्जा मंत्री यांच्या पर्यन्त पोहचवुन शेतकऱ्यांचे , कास्तकारांचे विजबिली माफ करणे तसेच वाढीव विज बिलचा माफ करणे तसेच वाढीव विज बिलचा निर्णय मागे घेण्यात यावा अशी आग्रहाची मागणी पोहचवावी. सदरील मागणी मान्य न केल्यास लोकशाही पध्दतीने जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत विज कंपनीच्या विरोधात आंदोलन छेडण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील, असे शेवटी निवेदनाद्वारे जालना शहराध्यक्ष उमेश पहेलवान खाकीवाले, शहर संघटक अनिल वानखेडे, शहर सचिव सुंदरलाल सगट, जिल्हा संपर्क प्रमुख गणेश चांदोडे , आनंद बोराडे, दुर्गेश पाचपिंडे, संतोष गायकवाड, आकाश घाटोळे, अर्जुन फत्तेलष्कर आदींचे स्वाक्षऱ्या आहेत.
Leave a Reply