ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

हर घर तिरंगा अभियानात सर्व समाजघटकांनी सहभागी व्हावे – भदंत पंय्याबोधी थेरो

August 1, 202213:01 PM 21 0 0

नांदेड – जिल्हा प्रशासनाने आवाहन केल्याप्रमाणे येत्या १३ ते १५ आॅगस्ट या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ या अभियानास लोकचळवळीचे रुप देण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन येथील अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरू संघनायक भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले. यावेळी भिक्खू चंद्रमणी, भिक्खू धम्मकिर्ती भिक्खू श्रद्धानंद यांच्यासह श्रामणेर भिक्खू संघ, माजी उपप्राचार्य साहेबराव इंगोले प्रा. एस. एच. हिंगोले, प्रा. विनायक लोणे, साहित्यिक प्रज्ञाधर ढवळे, आप्पाराव नरवाडे, सिद्धांत इंगोले यांची उपस्थिती होती.

तालुक्यातील खुरगाव नांदुसा परिसरातील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात संचालक भदंत पंय्याबोधी थेरो यांच्या अध्यक्षतेखाली ‘हर घर तिरंगा’ या अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पुढे बोलताना पंयाबोधी म्हणाले की,

 

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात हर घर तिरंगा या अभियानाने लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त केले आहे. सर्व जाती, धर्म, पंथ, संप्रदायातील सर्व समाजघटकांनी कोणतीही अनास्था न बाळगता मोठ्या उत्साहाने या अभियानात सहभागी झाले पाहिजे. यानिमित्ताने श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात ५५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज १३ आॅगस्ट रोजी फडकविण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *