जालना (प्रतिनिधी) : जालना जिल्हयातील विविध भागात दिनांक 15 जानेवारी 2021 पासून अयोध्यातील प्रभु श्रीरामाचे भव्य मंदीर निर्माणसाठी भव्य संपर्क व निधी संकलन अभियान सुरुवात होत आहे. या निमित्ताने जिल्हयातील सर्व रामसेवक बंधु भगिनीं पर्यंत पोहोचून त्यांना श्रीराम मंदीर अयोध्या संदर्भातील इतिहास व माहिती सांगितली जात आहे. पाचशे वर्षाच्या अखंड प्रयत्नाच्या नंतर व सुप्रीम कोर्टाच्या आदेशा नंतर श्रीराम मंदीराच्या बांधकामाची सुरुवात पवित्र अयोध्या नगरीत होत आहे. सदरील मंदीरासाठी, योगदानासाठी समाजातील विविध वर्गाला आवाहन करण्यात येत आहे.
नजीकच्या काळात महिलांसाठी महत्वाचा असा मंकर संक्रातीचा सण 14 व 15 जानेवारी येत आहे. महिला वर्ग मोठया प्रमाणात देवाच्या देवळात व ऐकमेकींना वाण देत अखंड सौभाग्यासाठी कामना करुन सदरील सण साजरा करतात. या वर्षी सर्व माता भगिनींनी प्रभु श्रीराम व सितामाई यांच्या नावाने वाण देत अयोध्यातील भव्य मंदीराचे निर्माणासाठी योगदान देऊन या वर्षीची मकर संक्रांत आगळया वेगळया प्रकारे साजरी करावी असे आवाहन राष्ट्र सेवीका समितीच्या जिल्हा कार्यवाहीका व श्रीराम मंदीर बांधकाम निधी संकलन समितीच्या महिला प्रमुख सौ.भावना मुळे यांनी केले आहे.
या संदर्भातील जिल्हयातील विविध तालुक्यातील व जालना शहराच्या विविध भागातील महिला मंडळे, महिला बचत गट व विविध क्षेत्रातील प्रमुख महिलांच्या बैठकीत सौ.भावना मुळे बोलत होत्या त्याच्यासोबत सौ.अंजली बडवे, सौ.शुभदा देशमुख, सौ.संपदा कुलकर्णी, सौ.मेगदे, सौ.देशपांडे, सौ.जोशी, सौ.देठे व विविध पदाधिकारी देखील महिला वर्गाच्या सदरील अभियानात सहभागासाठी व भरीव योगदानासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्हयातील व शहरातील विविध भागातील महिलांनी सदरील अभियानात जोडले जाण्यासाठी मो. 9960840724 या क्रमांकावर साधवा असे आवाहन सौ.भावना मुळे व पदाधिकारी यांनी केले आहे.
Leave a Reply