ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

कवी दत्ताहरी कदम यांना अष्टपैलू राज्यस्तरीय पुरस्कार

October 4, 202113:29 PM 51 0 0

नांदेड – येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या भोकर शाखेचे अध्यक्ष कवी दत्ताहरी कदम यांना अष्टपैलू राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार जाहीर झाला आहे. याबाबतचे पत्र अष्टपैलू संस्कृती कला अकादमीचे संचालक शिवाजी खैरे यांनी आॅनलाईन पद्धतीने कदम यांना कळविले आहे. अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई (रजि.) या संस्थेच्या व मासिक वृत्तपत्र ” न्यायप्रभात ” च्या माध्यमातून ‘ अक्षरमंच ‘ या हॉट्सअ़ॅप समुहात नवोदित कवी – कवयित्री, महिला व पुरुष गटातून काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात येतात. सलग १२ महिने स्पर्धेत सहभागी होवून स्वरचित उत्तम कविता सादर केलेल्या या प्रज्ञावंत,नवोदित साहित्यिकांना संस्थेच्या वतीने अष्टपैलू काव्यलेखन हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यात दत्ताहरी एकनाथराव कदम यांच्यासह १७ कवयित्री आणि दोन कविंचा समावेश आहे.


ऑक्टोबर २०२० पासून सप्टेंबर २०२१ पर्यंत एकही महिन्यात खंड न पडता सलग बारा महिने या स्पर्धकांनी काव्यलेखन स्पर्धेत सहभागी घेऊन उत्तम कविता सादर केल्या आहेत. अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई या संस्थेकडून या नवोदित कवी – कवयित्रींना प्रदान करण्यात येणारा हा राज्यस्तरीय पुरस्कार संस्थेच्या ‘ अक्षरमंच ‘ काव्यलेखन समुहात प्रत्येक महिन्याला होणाऱ्या काव्यलेखन राज्यस्तरीय स्पर्धेत सलगपणे एक वर्षभर ज्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांनी सादर केलेल्या स्वरचित व उत्तम साहित्याची दखल घेवून त्यांच्या साहित्यकलेचा विशेष गौरव व लेखनकलेसाठी प्रोत्साहन म्हणून हा पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष नागोराव डोंगरे, महासचिव पांडूरंग कोकुलवार, गंगाधर ढवळे, कैलास धुतराज, मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, बाबुराव पाईकराव, रुपाली वैद्य वागरे, रणजीत गोणारकर, गोविंद बामणे, भीमराव ढगारे लक्ष्मण कोंडावार, रविराज भद्रे, लक्ष्मण लिंगापुरे, गौतम कांबळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *