ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

विद्यापीठ विकास मंचाचे सर्व उमेदवार निवडून येतील : आ. संतोष दानवे

June 16, 202212:21 PM 24 0 0

जालना (प्रतिनिधी) :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीच्या कार्यालयाचे उद्घाटन आ. संतोष दानवे यांच्याहस्ते करण्यात आले. पदवीधर मतदारांना आपली मतदार नोंदणी करून घेण्यासाठी जालना येथील चमन जवळ काळूका माता मंदिरा समोर विद्यापीठ विकास मंचच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घघाटन करण्यात आले. यावेळी आ. संतोष दानवे म्हणाले शिक्षणामुळे माणुस घडतो त्याला चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी विद्यापीठात चालेला गोंधळ थांबवण्यासाठी विद्यापीठ विकास मंचच्या उमेदवारांना भरघोस मतानी निवडून दयावे.

यावेळी विद्यापीठ विकास मंचाचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. गजानन सानप यांनी विद्यापीठ विद्यार्थी विकास केंद्रित झाली पाहिजेत प्राध्यापकाच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी विद्यापीठ विकास मंच सदैव कार्य करत आला आहे केवळ आंदोलनातून प्रश्न सुटणाऱ नाहीत त्यासाठी सत्ता आवश्यक असते त्यामुळे विद्यापीठ विकास मंचाच्या सर्व उमेदवारांना निवडून येतील यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत. सिनेट सदस्य डॉ. भगवानसिंग डोभाळ म्हणाले जिथे दानवे साहेब असतात तेथे विजय नक्की असतो त्यामुळे विद्यापीठ विकास मंचचा विजय निश्चित होईल. सिनेट सदस्य नरहरी शिवपुरे यांनी पदवीधर नाव नोंदणीसाठी आवश्यक असणारी माहिती सांगितले. यावेळी सिनेट सदस्य भास्करआबा दानवे, विजयराव देशमुख, प्रा. नाना गोडबोले, प्रदेश मंत्री अंकिता पवार, डॉ. विक्रम दहीफळे, डॉ. सोमीनाथ खाडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंबरवाड़ीकर तर आभार ॲड. बाबासाहेब इंगळे यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संखेने प्राध्यापक व पदवीधर उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *