खोपोली – खालापूर प्रेस क्लबच्या वतीने विविध शासकीय अधिकारी यांचा स्वागत व मुख्याधिकारी गणेश शेट्ये यांचा निरोप समारंभ संपन्न.या सोहळ्यास शहरातील अनेक पत्रकार व मान्यवर यांची उपस्थिती.सर्व मान्यवरांनी खालापूर प्रेस क्लबने आयोजीत केलेल्या या अगल्या वेगळ्या कार्यक्रमाचे केले कौतुक. मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र आणि रायगड प्रेस क्लबशी संलग्न असलेल्या खालापूर प्रेस क्लबच्या वतीने शुक्रवारी खालापूर व खोपोली शहरात नव्याने नियुक्ती झालेल्या प्रमुख शासकीय व पोलीस अधिकारी वर्गाचा स्वागत समारंभ आणि खोपोली नगरपालिकेचे बदली होऊन गेलेले मुख्याधिकारी गणेश शेटे यांचा निरोप समारंभ असा दुहेरी कार्यक्रम आयोजित केला होता.व्यासपीठ मिळाल्यावर शासकीय अधिकारी ही भाषणात चौकार, षटकारांची आतषबाजी करू शकतात हे या कार्यक्रमात सर्व उपस्तितांनी अनुभवले.
प्रांत अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार आयुब तांबोळी, मुख्याधिकारी अनुप दुरे, गटविकास अधिकारी बालाजी पुरी, वनअधिकारी पवार, पोलीस निरीक्षक शिरीष पवार, खालापूर पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांचा स्वागत सन्मान सोहळा साजरा झाला एकाच व्यासपीठावर सर्व अधिकारी आणून प्रेस क्लबने वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.खोपोलीतील केमपॉलियन रिसॉर्ट च्या सभागृहात हा सोहळा संपन्न झाला. पनवेल येथे उपायुक्त म्हणून बदली झालेले खोपोली न पा चे मुख्याधिकारी गणेश शेट्ये यांचा क्लबच्या वतीने गणेशमूर्ती देऊन सन्मान करीत त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर,नगराध्यक्षा सुमन औसरमळ, उपनगराध्यक्षा विनिता कांबळे, गटनेते तथा नगरसेवक सुनील पाटील, नगरसेवक किशोर पानसरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर शहरातील विविध राजकीय, सामाजिक, बांधकाम क्षेत्रातील मान्यवर आणि तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते.हा आगळा वेगळा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून खालापूर प्रेस क्लब चे जेष्ठ सल्लगार भाई ओव्हाळ, अध्यक्ष प्रशांत गोपाळे,तसेंच प्रेस क्लबचे प्रवीण जाधव, मुकुंद बेंबडे,सीताराम पाटील, रवींद्र मोरे, अनिल पाटील, काशिनाथ जाधव, नवज्योत पिंगळे, बंटी साळुंखे, समाधान दिसलें, संतोषी म्हात्रे, संतोष गोतारणे या पदाधिकारी वर सदस्य यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.
Leave a Reply