ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आरोग्यासाठी योगा सोबतच राष्ट्रीय खेळ व वृक्ष लागवड महत्वाची

June 17, 202214:07 PM 32 0 0

संयुक्त राष्ट्र परिषदेत प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर ११ डिसेंबर २०१४ ला संयुक्त राष्ट्र महासभेने दरवर्षी २१ जूनला जागतिक योग दिन म्हणून मान्यता देण्याचे मान्य केले आणि २१ जून २०१५ ला पहिले आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरे केल्या गेले. योगाला भारत सरकारने जागतिक दर्जा देवून भारताची मान जगात उंचावली आहे याचे मी स्वागत करतो. योग व्यायामाचे आणि आरोग्याचे प्रभावशाली माध्यम असुन शरीरांच्या अवयवांचाच नव्हे तर मन, मेंदू आणि आत्म्याचे संतुलन ठेवण्याचे काम योगाच्या माध्यमातून होत असते. योग ही भारतातील ५ हजार वर्षे जुनी परंपरा असुन शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधना आहे.त्यामुळे ऋषी-मुनी, तपस्वी यांनी योग संस्कृती अवलंबली होती.आरोग्य रक्षणासाठी योगा व व्यायाम अती आवश्यक. अत्याधुनिक युगात व बदलत्या काळानुसार मानवजातीला मनमोकळे पणाने बागडण्या करीता जागा किंवा ग्राउंड अपुरे पडताना दिसतात. कारण आधुनिक युगात आपण कुठेही नजर फिरवली तर आपल्याला गगनचुंबी इमारती, कारखाने, उद्योगधंदे मोठ्या प्रमाणात दिसुन येतात.

अशा परीस्थितीत लहान-मोठी, आबाल-वृध्द खुल्या हवेत बागडु शकत नाही.परंतु शरीराला व्यायाम सुध्दा आवश्यक असतो.अशा वेळेला आपण योगा,व्यायाम शाळा व जिमचा सहारा घेवून शरीराला सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न सर्व करतात.पुर्वी अनेक मातीतील खेळ खेळले जायचे व जखमा सुध्दा व्हायच्या परंतु या जखमा त्याच मातीने दुरूस्त सुध्दा व्हायच्या.अशा परीस्थितीत शरीराच्या प्रत्येक अवयवांचा व्यायाम होत असे.परंतु कालांतराने संपूर्ण जुने छोटे-मोठे खेळ लुप्त होतांना दिसते.परंतू शरिर सुदृढ व निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम अती आवश्यक आहे.योगाच्या सहाय्याने आपण घरबसल्या व्यायाम करू शकतो.आज जगातील १७५ देशांनी योगाभ्यास अंगीकारला आहे.यात अनेक मुस्लिम राष्ट्र सुध्दा आहेत.हा भारताचा मोठा मान आहे.कारण समाजातील प्रत्येक कुटुंबातील लहान-मोठे योगाभ्यास करून आपले आरोग्य सुदृढ ठेवु शकतो.आजच्या परिस्थितीत मुल पुढील भविष्याच्या वाटचालीकरीता अभ्यात मग्न असतात आणि मनोरंजनाचे साधन म्हणून भारतासह जगातील ८० टक्के जनता मोबाईलच्या व कांम्पुटरच्या आदीन झाल्याचे दिसून येते.यामुळे डोक्यावर तान येने, डोळे दुखने,मेंदुवर परीनाम होने इत्यादी अनेक विकार मोबाईलमुळे व कांपुटरमुळे होतांना आपण पहातो.परंतु यावर निराकरण करण्याचे काम योगा करने, व्यायाम करणे, जिमनॅस्टिक,किंवा जिमच्या माध्यमातून शरिरयष्टी सुदृढ ठेवने अत्यंत गरजेचे आहे.आपण योगाभ्यासचा विचार केला तर भारतात अनेक युगानु-युगापासुन योगाभ्यास ऋषी-मुनी,साधु-संत, महायोगी, तपस्वी इत्यादी अनेक महान विभूती झाडाखाली योगसाधना करायची.परंतु आज वाढते प्रदुषण, धावपळीचे जीवन,वाढते औद्योगिकीकरण व शहरीकरण यामुळे खुला व्यायाम करण्यास अनेक अडचणी निर्माण होतात.परंतु योगाभ्यास चार भिंतींच्या आत सुध्दा करता येतो.त्यामुळेच जगातील अनेक देशांनी योगाभ्यासला जास्त महत्व दिले आहे.भारताने योगाला जागतिक पातळीवर नेऊन भारत योगगुरू बनला आहे.त्याचप्रमाणे भारताने योगाभ्यास जागतिक पातळीवर नेऊन जगाला व्यायामाची मोठी दीशा देण्याचे काम सुद्धा केले आहे.भारत जागतिक पातळीवर लोकांचे जीवन उंचावण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील रहाला आहे.त्याच ठीकाणी चीन हा जागतिक पातळीवर करोना महामारीच्या रूपाने व विस्तारवादी नितीमुळे करोडो लोकांचा हत्यारा बनला आहे.भारताच्या चांगल्या कामाने जगाचा गुरू बनला तर चीन जगाचा दुश्मन बनला आहे.

योग दिनाच्या निमित्ताने सर्वांनीच योगाभ्यास अंगीकारला पाहिजे.योग दीनाच्या निमित्ताने प्रदुषणावर मात करण्यासाठी प्रत्येकांनी “घर तीथे झाड” ही मोहीम राबवुन या दीवसाला आगळेवेगळे ऐतिहासिक महत्व देवुन वृक्षारोपण केले पाहिजे.कारणआरोग्यासाठी वृक्ष ही सर्वांसाठी संजीवनी आहे.आपल्या राज्यात ३६ जिल्हे, प्रत्येकात साधारण ५ तालुके, म्हणजे १८० तालुके व राज्यात आमदार २८८ (वि.परिषदचे वेगळेच) वृक्षारोपण हा मुद्दा आमदार, कलेक्टर,बीडीओ, असे अनेक जबाबदार अधिकारी मिळून प्रशासनाने योग दिनाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करायला हवी. जागतिक योग दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात साजरा होणार आहे. आजच्या परिस्थितीत ज्याप्रमाणे मनुष्याच्या आरोग्यासाठी योगाकरणे आवश्यक आहे.त्याच प्रमाणे ऑक्सिजनची मात्रा वाढविण्यासाठी वृक्षारोपण करने अत्यंत गरजेचे आहे.याकडे मुख्यत्वेकरून प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.योग दिनाच्या निमित्ताने प्रशासने शाळा, महाविद्यालये, एसटी स्टँड, संपूर्ण प्रशासकीय ठिकाणे, कारागृह या संपूर्ण ठिकाणी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने वृक्षारोपण व्हायला हवे.यामुळे जागतिक विक्रम होईलच सोबत आरोग्याची जोपासना सुध्दा होईल.अशाप्रकारे योगासोबत आरोग्यासाठी वृक्षारोपण चळवळ पुढे नेली पाहिजे.कारण ह्या संपूर्ण बाबी आरोग्याशी निगडित आहे.योगाभ्यासमुळे शारीरिक, मानसिक,आध्यात्मिक, आरोग्य आणि शांतीसाठी याचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळतो.त्यामुळेच जगातील १७५ देशांनी योगाला स्विकारले आहे.भारतातच नाही तर संपूर्ण जगात वाढते नवीन-नवीन आजार चिंतेचा विषय आहे.त्यामुळे योग साधना करून व्यायाम करणे तेवढेच आवश्यक आहे.कारण “आरोग्य हिच संपत्ती”हा मुलमंत्र सर्वांनीच अंगीकारला पाहिजे.योग दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारने व राज्य सरकारने राष्ट्रीय खेळांना महत्व देवून व्यायाम करण्याची प्रवृत्ती जागृत करण्याची गरज आहे.जगातील प्राचीन संस्कृती भारतात आताही आहे.त्यामुळे आपल्याला योग परंपरेच्या माध्यमातून ती पहायला मिळते.त्यामुळे आज योगाभ्यास जगासाठी “अनमोल रत्न” सिध्द होत आहे. याचा भारतीयांना अभिमान आहे.योग दिनाच्या निमित्ताने ऑक्सिजनची मात्रा वाढवीन्यासाठी आपण सर्वांनी वृक्षारोपणाचा “संकल्प” करावयास पाहिजे.कारण पुर्वी ऋषी मुनी, तपस्वी,महाग्यानी झाडाखालीच योगाभ्यास करायचे, त्याचप्रमाणे पुर्वी शिक्षण सुध्दा झाडाखालीच व्हायचे यावरून स्पष्ट होते की वृक्षा शिवाय पुढचे पाऊल अवघड असते.त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने योग दिनाच्या निमित्ताने जास्तीत जास्त वृक्षारोपण कसे करता येईल याकडे सरकारने व सामाजिक संघटनांनी लक्ष देण्याची गरज आहे. योगा करूया;व्यायाम करूया; वृक्ष लावुया; वृक्ष जगवुया आणि निसर्गाचा समतोल राखण्याचा संकल्प करूया.

लेखक – रमेश कृष्णराव लांजेवार

 मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर

Categories: लेख, साहित्य
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *