जालना ( प्रतिनिधी) : पन्नास टक्के उपस्थिती च्या अटीवर शाळा सुरू करण्यात आल्या असल्या तरी शाळा बाह्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या साठी शिक्षण विभागाने पर्यायी व्यवस्था करावी . तसेच फीस चे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे दोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते. त्या अनुषंगाने खासगी शाळांनी फीस च्या नावाखाली ऑनलाईन शिक्षण बंद करू नये .नसता न्यायालयाच्या अवमान प्रकरणी शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अवमान याचिका दाखल करण्यात येईल.
असा इशारा शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक डॉ. आत्मानंद भक्त यांनी दिला आहे.
या संदर्भात बुधवारी ( ता. १०) प्रसिद्धीस दिलेल्या पञकात डॉ आत्मानंद भक्त यांनी म्हंटले आहे की, कोवीड महामारी मुळे गत दहा महिन्यांपासून शाळा बंद होत्या.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. तथापि काही शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले. याचा सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना काहीच फायदा झाला नाही. तर जेथे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. अशा संस्थांनी अव्वाच्या सव्वा फीस वसूल करून तुघलकी कारभार करत फीस भरण्यास विलंब झाल्यास ऑनलाईन शिक्षण बंद केले.यामुळे पालक वर्ग मेटाकुटीस आला. असे नमूद करत डॉ आत्मानंद भक्त म्हणाले, कोवीड चा प्रादुर्भाव कमी झाल्याने पन्नास टक्के उपस्थिती , भौतिक अंतर राखून मास्कसह आरोग्य च्या दृष्टीने योग्य अटींवर शासनाने शाळा सुरू केल्या असल्या तरी कोवीड च्या धास्ती मुळे हमी पञ भरून देण्यास पालकांची मानसिकता अद्याप झालेली नाही. पालकांसोबत विद्यार्थी ही कोवीड महामारी च्या भितीने धास्तावले असून अशा परिस्थितीत शाळेत जाऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॉलनी, वसती , निहाय तसेच ग्रामीण भागात पारावर, वाडी, वस्ती, तांड्यावर जाऊन ज्ञानार्जनाची सुविधा उपलब्ध करावी. तसेच सीबीएसई, आयसीएसई, व राज्य शासनाच्या अखत्यारीत सुरू असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी नियमीत शाळांबरोबरच शाळेत येऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाच्या सुविधा पुर्ववत सुरू कराव्यात विशेष म्हणजे कोवीड महामारी मुळे सर्वसामान्य पालकांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असल्याने या पार्श्वभूमीवर फीस वसुली च्या नावाखाली विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये नसता शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शहर शाखेच्या वतीने खासगी शाळांची झाडाझडती घेतली जाईल. असा इशारा ही डॉ आत्मानंद भक्त यांनी दिला आहे.
Leave a Reply