ताज्या बातम्या
   पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या साप्ताहिकासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आंबेडकरी समुदायाने भीमजयंती घरातच साजरी करावी – धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो

April 9, 202117:39 PM 13 0 0

नांदेड – ऐन एप्रिल महिन्यातच कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. साधारणपणे प्रत्येक घरात एक- दोन रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे.‌ कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आंबेडकरी समुदायाने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती घरातच साजरी करावी असे आवाहन धम्मगुरू भदंत पंय्याबोधी थेरो यांनी केले आहे.

ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा येथे भीमजयंती साजरी करण्याबाबत ते बोलत होते. यावेळी भदंत सत्यशिल महाथेरो, भदंत पंय्याबोधी थेरो, भंते संघरत्न, भंते धम्मकिर्ती, भंते सुदर्शन, भंते श्रद्धानंद, भंते संघमित्र, भंते सुमेध, भंते सुभद्र, भंते सदानंद, भंते सुनंद, भंते शिलभद्र, संस्थेचे सचिव प्राचार्य साहेबराव इंगोले, धम्मसेवक गंगाधर ढवळे, आप्पाराव नरवाडे, नागोराव नरवाडे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना पंय्याबोधी म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता याहीवेळी भीमजयंती संबंधित बुद्ध विहारासमोरील ध्वजारोहण फक्त पाच लोकांच्याच उपस्थितीत करुन आपापल्या घरीच गोडधोड खाऊन जयंती साजरी करावी. आंबेडकरी समाजाने सदरील परिस्थिती लक्षात घेता प्रशासनास सहकार्य करावे, कोणीही रस्त्यावर येण्याचा अट्टाहास धरु नये, असेही ते म्हणाले.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याबाबत बैठक घेण्यात आली. शासनाच्या आदेशानुसार ३० एप्रिल पर्यंत जिल्हाभरात जमावबंदी कलम १४४ लागू करण्यात आले आहे. त्यामुळे कोणतेही धार्मिक, राजकीय तथा सामाजिक कार्यक्रम आयोजित करता येणार नाहीत. प्रशासनाचे पारित आदेश सर्व समाजबांधवांपर्यंत पोहचविण्यात यावेत तसेच सर्व उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, पोलीस स्टेशन स्वाधीन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात यासंदर्भात संबंधितांच्या बैठका घेऊन शासनाचे तथा प्रशासनाचे आदेश सर्वांपर्यंत पोहचविण्यात यावेत याबाबत सूचना देण्यात याव्यात आणि आगामी भीमजयंती आपापल्या घरातच राहून साजरी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनीही केले आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *