ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

वीर वाजेकर महाविद्यालयात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांना प्रारंभ

August 10, 202213:43 PM 10 0 0

उरण ( संगिता पवार ) : येथील रयत शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय फुंडे येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक 9 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी नियोजन प्रमाणे सकाळी 11 वाजता राष्ट्रीय समूह गान संपन्न झाले.
त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन या विषयावर एका विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून रायगड भूषण श्री. जयपाल पाटील हे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या व्याख्यानात भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचा आढावा घेतला. खऱ्या अर्थाने देश स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी आपले बलिदान दिले त्यांचे बलिदान आपण सार्थ ठरवणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.

आजच्या युवकांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये व्यापक स्वरूपाचे कार्य करावे आपत्ती व्यवस्थापन माध्यमातुन राष्ट्रीय स्तरावर व्यापक स्वरूपाचे कार्य विद्यार्थी करू शकतात याचाच आढावा त्यांनी आपल्या व्याख्यानात घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.जी. पवार उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. पवार यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचे
सिंहावलोकन करून आजच्या युवकाच्या जबाबदाऱ्या आणि त्यांचे कार्य या विषयावर मार्गदर्शन केले. खऱ्या अर्थाने आजचा युवक हा जबाबदार भारतीय नागरिक आहे आपल्या देशाला जागतिक पातळीवर नेऊन सोडण्याचे कार्य तो करू शकतो आणि तरच हा स्वराज्याचा महोत्सव यशस्वी होईल, असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.सुनील जगधनी यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. विलास महाले यांनी करून दिली. त्याचबरोबर त्यांनी उपस्थितांचे आभारही मानले सूत्रसंचालन डॉ.विद्या नावडकर यांनी केले.कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. यू. टी घोरपडे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *