ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

टूथपेस्टच्या ऐवजी उंदीर मारण्याच्या विषारी पेस्टनं घासले दात, 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू

September 14, 202113:20 PM 78 0 0

मुंबई : आपण कुणीही ब्रश करुनच आपल्या दिवसाची सुरुवात करतो. मुंबईतील धारावीत राहणाऱ्या 18 वर्षीय अफसाना खाननं रविवारी सकाळी ब्रशवर पेस्ट घेतली आणि दात घासण्यास सुरुवात केली. मात्र ती सकाळ अफसानाच्या आयुष्यातली शेवटची सकाळ ठरली. कारण अफसानानं अनावधानानं टूथपेस्टच्या ऐवजी उंदीर मारण्यासाठी वापरली जाणीर विषारी पेस्ट ब्रशवर घेतली होती. बाथरुममध्ये टूथपेस्टच्याच बाजूला उंदीर मारण्याची पेस्ट ठेवल्यामुळं हा धक्कादायक प्रकार घडला आणि यामध्ये अफसाना खानचा दुर्दैवी मृत्यू झाला. अफसाना खान जेव्हा सकाळी उठली आणि आपले दात घासायला गेली तेव्हा टूथपेस्टच्या बाजूला उंदीर मारायाची पेस्ट ठेवली होती. जी तिनं चुकून ब्रशला लावली आणि आपले दात घासण्यास सुरुवात केली. ब्रश करता करता वासावरून अफसानाला आपण टूथपेस्ट ऐवजी दुसरच काहीतरी लावल्याचं जाणवलं.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 18 वर्षीय अफसाना खान सकाळी उठली आणि दात घासायला बाथरुममध्ये गेली. जिथे टूथपेस्टच्या बाजूला उंदीर मारण्याची विषारी पेस्ट ठेवली गेली होती. नकळत तिनं ब्रशला उंदीर मारायची पेस्ट लावली आणि ब्रश करू लागली, वास आणि चवीमुळे आपण उंदीर मारायची पेस्ट लावल्याचं जाणवलं तेव्हा तिनं लगेच तोंड धुतलं. मात्र तोंड धुतानाच अफसानाला अचानक चक्कर येऊ लागली आणि तिची तब्येत ढासाळू लागली. घडलेला सर्व प्रकार तिनं तिच्या घरच्यांना सांगितला. घरच्यांनी क्षणाचाही विलंब न करता अफसानाला जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. जेजे रुग्णालयात अफसानावर उपचार सुरु होते, मात्र उंदीर मारण्याच्या पेस्टमधील विष संपूर्ण शरीरात पसरलं होतं आणि रविवारी संध्याकाळी अफसानाची दुर्दैवी मृत्यू झाला.
अफसाच शिक्षण अर्धवट राहिलं होतं आणि ती घरीच असायची. तिच्या कुटुंबात आई, वीस वर्षीय बहीण आणि दोन लहान भाऊ असा परिवार होता. आई फळं विकून आपलं घर चालवत होती. बहीणही घरीच असायची. पोलिसांनी या प्रकरणात एडीआर दाखल करून तिच्या आईचा जबाब नोंदवला आहे. तिच्या आईनं घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला असून आपल्याला या प्रकरणात कोणावरही संशय नसल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. दरम्यान, सकाळी उठल्यानंतर अफसानाने जराशी काळजी घेतली असती तर कदाचित तिला जीव गमवावा लागला नसता.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *