ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

आपला माणूस श्री दिलीप किसनराव आमले यांच्या रूपाने रिक्षा चालकास भेटलेला देवदूत

July 7, 202213:08 PM 23 0 0

उरण (तृप्ती भोईर) :  आपण म्हणतो आजकाल माणसातील माणूसपण हरवत चालला आहे पण हे विधान खोटे आहे सिद्ध करणारे गोरगरिबांचे कैवारी प्रमुख मार्गदर्शक विजय नहाटा फाउंडेशनचे अध्यक्ष राज्यमंत्री मा.विजय नहाठा साहेब अध्यक्ष केंद्रीय पर्यावरण समिती महाराष्ट्र राज्य, यांच्या सहकार्याने आपला माणूस दिलीप किसनराव आमले अध्यक्ष शिव वाहतूक सेवा नवी मुंबई रिक्षा चालक व मालक सेवाभावी संस्था नवी मुंबई .हे गेल्या २७ वर्षापासून रिक्षा चालकांना सेवा पुरवीत आहेत

या सेवेमध्ये २०हजार रिक्षा, टॅक्सी चालकांना मोफत हेल्थ कार्ड वाटप, १लाख रुपये अपघात विमा, लसीकरण, विविध भागात मोफत रिक्षा सेवा ,अन्नधान्य, वाटप दिवाळी फराळ, रिक्षा फवारणी , गोरगरीबांना जेवणाची सोय, सॅनिटायझर मास्क वाटप, रिक्षा कव्हर ,रिक्षा हुड, मीटर कव्हर ,मोफत आयकार्ड तसेच कोरोना काळात आर्सिनीक अल्बम ३०गोळ्या वाटप ,गरजू रिक्षा चालकांना आर्थिक मदत, २४ तास ना नफा ना तोटा ‘या तत्त्वावर रुग्णवाहिका सेवा, कोरोना बाधित रिक्षा चालकाच्या कुटुंबीयांना अत्यावश्यक सेवा, शासकीय १५००रु. मदतीची ऑनलाईन सुविधा ,पावसाळ्यात मोफत रिक्षा पडदे वाटप यांसारखी मदतीची आकडेवारी पाहता व रिक्षा व टॅक्सी चालक व वाहतूकदारांच्या कुटुंबीयांसाठी “एक हात मदतीचा” असे अनेक उपक्रम करून आपला माणूस दिलीप किसनराव आमले माणुसकीचे दर्शन घडवत आहेत.

टॅक्सी चालकांच्या आरोग्याची काळजी म्हणून त्यांनी केलेल्या आरोग्य तपासणीत ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. मा.विजय मेहता यांच्या विशेष सहकार्याने आपला माणूस दिलीप किसन किसनराव कांबळे व सहकारी यांच्या मार्फत ऑटो हेल्थ कार्ड चे मोफत वाटप होत आहे .आपला माणूस दिलीप किसनराव आमले यांनी स्वताचा फोन नंबर देऊन त्यांची ही सेवा २४ तास सेवा चालू आहे. आज “माणसातील देवदूत “ही उपमा त्यांच्यासाठी खरी होत आहे.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *