(जालना प्रतिनिधी) :- जालना तालुका कार्यकर्त्याची तातडीची बैठक दिनांक 30/8/2021 रोजी सोमवारी दुपारी 2:00 वा जालना जिल्हा संपर्क कार्यालय कचेरी रोड जालना येथे जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे पश्चिम व पूर्व जिल्हा अध्यक्ष भालचंद्र भोजने यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष ॲड.कैलास रत्नपारखी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत जालना तालुका कार्यकर्ते यांची उपस्थिती असणे आवश्यक असून येणाऱ्या निवडणूक व पक्ष बांधणी, दिनांक 02/09/2021 रोजीच्या महाराष्ट् अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या दौ-या संदर्भात नियोजन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी जालना तालुक्यातील कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्ष डेव्हीड घुमारे, जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजने, जालना तालुका अध्यक्ष ॲड. कैलास रत्नपारखी हे विशेष मार्गदर्शन करणार आहे.
तरी सर्व जालना तालुक्यातील कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जालना तालुका अध्यक्ष ॲड. कैलास रत्नपारखी यांनी केले आहे.
Leave a Reply