(जालना प्रतिनिधी) :- जालना शहर कार्यकारिणीची महत्वाची बैठक जिल्हा संपर्क कार्यालय कचेरी रोड जालना आज दिनांक 10/09/2021 शुक्रवार दुपारी 1:00 वा संपन्न झाली यावेळी जिल्हा अध्यक्ष डेव्हिड घुमारे यांच्या अध्यक्षखाली व शहर अध्यक्ष कैलास रत्नपारखे,शेख लालाभाई, प्रशांत कसबे, प्रा. संतोष आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडली.
या बैठकीत जालना जिल्हाध्यक्ष डेव्हीड घुमारे यांनी मुस्लीम समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जालना शहरात येणाऱ्या काही दिवसात ठिकठिकाणी धरणे आंदोलने व निर्दशने असे कार्यक्रम राबवून मुस्लीम बांधवांना तात्काळ आरक्षण मिळण्यासाठी शहर पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत व येणाऱ्या नगर परिषद निवडणुका संदर्भात जालना शहरात शाखा स्थापना व पक्ष, बुथ बांधणीचे काम सर्व शहर पदाधिकारी यांनी हाती घ्यावेत. तसेच वंचित बहुजन आघाडीचे सभासद नोंदणी प्रत्येक पदाधिक-यांनी होवून इतरांना सुध्दा सभासद करुन घ्यावेत असे मार्गदर्शन केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष डेव्हीड घुमारे, शहर अध्यक्ष कैलास रत्नपारखे, शेख लाला, प्रशांत कसबे, प्रा.संतोष आढाव, सुनिल मगरे, अर्जन जाधव, अमोल लोखंडे, रामदास दाभाडे, अमोल कस्तुरे, सुरज सोनवणे, अनिल झोटे, सागर गायकवाड, आदींची उपस्थिती होती.
Leave a Reply