ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

बेटी बचाव बेटी पढाव साठी नागाव अंगणवाडी सेविकांनी रॅली काढून केले समाज प्रबोधन

January 26, 202212:46 PM 48 0 0

उरण ( संगिता पवार ) : एकात्मिक बाळ विकास योजनेच्या अनुषंगाने उरण तालुक्यातील नागाव शाळेच्या अंगणवाडी सेविकांनी मुलींचे समाजात महत्वाचे स्थान आहे हे पटविण्यासाठी बेटी बचाव बेटी पढाव साठी गावामध्ये रॅली काढून प्रबोधन करण्याचे काम हाती घेतले आहे. आजही समाजामध्ये मुलीला समान मान असताना मुलींना वागणूक मिळत नाही तर मुलींना शिक्षनामध्ये मागे ठेवले जाते तसेच आज समाजामध्ये मुलींचे प्रमाण ही कमी झाले आहे जवळजवळ १००० पुरुषांच्या मागे ८५० ते ९००स्त्रीया आहेत .
वंशाला दिवा पाहिजे या साठी मुलींचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. मात्र स्त्री चे महत्व खूप मोठे आहे तिच्या मुळेच सार काही घडत आहे काही होऊ शकते ,एक स्त्री शिकली तर सारे कुटूंब शिकत असते या साठी एक मुलगी वाचणे आणि ती पुढे शिकणे हे महत्वाचे आहे या दृष्टीकोनातून आज नागाव शाळेतील अंगणवाडी सेविकांनी बेटी बचाव बेटी पढाव साठी रॅली काढून समाज प्रबोधन केले तसेच माझी कन्या भाग्यश्री योजना याचे ही महत्व पटवून दिले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *