ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

करंजा टर्मिनल ॲण्ड लॉजिस्टकच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा संतप्त मच्छीमारांचा इशारा

September 29, 202114:44 PM 17 0 0

उरण ( संगिता पवार ) करंजा खाडीत कोळशाच्या वाहतुकीमुळे सागरी जलप्रदूषणाची समस्या : जलप्रदूषणामुळे मासळीचा दुष्काळ : स्थानिक हजारो मच्छीमारांवर उपासमारीचे संकट : कोळशाची वाहतूक तत्काळ बंद करण्यात यावी : अन्यथा समुद्रातच मालवाहू बार्ज रोखुन करंजा टर्मिनल ॲण्ड लॉजिस्टकच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा संतप्त मच्छीमारांचा इशारा ! उरण : कांदळवन कत्तली प्रकरणी विविध शासकीय विभागांकडून चौकशीचा फार्स सुरू असतानाच करंजा टर्मिनल ॲण्ड लॉजिस्टक प्रा. लि. कंपनीने करंजा खाडीतुन कोळशाच्या वाहतुकीची सुरुवात केली आहे.बार्जव्दारे मोठ्या प्रमाणावर केली जात असलेल्या कोळशाच्या वाहतुकीमुळे करंजा खाडीत सागरी जलप्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे.या सागरी जलप्रदूषणामुळे मासळी मिळेनाशी झाल्याने येथील हजारो स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीचे संकट आले आहे.यामुळे संतप्त झालेल्या मच्छीमारांनी कोळशाची वाहतूक बंद करण्यात यावी अन्यथा समुद्रातच मालवाहू बार्ज रोखुन कंपनी विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.


करंजा खाडीत करंजा टर्मिनल ॲण्ड लॉजिस्टक प्रा. लि. कंपनीने कंटेनर टर्मिनलच्या उभारणीच्या कामाला सुरुवात झाल्यापासुनच येथील शेतकरी, मच्छीमारांचा कंपनीच्या विरोधात संघर्ष सुरू झाला आहे.महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडून ३० वर्षांसाठी भुईभाड्याने घेऊन सुरू करण्यात येत असलेल्या करंजा टर्मिनल ॲण्ड लॉजिस्टक प्रा. लि. कंपनीच्या कंटेनर टर्मिनलच्या उभारणीलाच येथील मच्छीमारांनी विरोध दर्शविला आहे.मच्छीमारांच्या हिताविरोधात टर्मिनलचे उभारण्याचे काम सुरू असल्याने येथील मच्छीमारांचा कंपनीच्या विरोधात मागील ११ वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.
कंपनीशी विविध कारणांसाठी संघर्ष सुरू असतानाच तीन सप्टेंबर २०२१ पासून करंजा टर्मिनल ॲण्ड लॉजिस्टिक प्रा. लि. यांच्या बहुद्देशीय बंदरावर इंडो एनर्जी यांच्या माध्यमातून दिवस -रात्र बार्जमधुन कोळशाची मालवाहतूक सुरू करण्यात आली आहे.दररोज जहाजांमधून लाखो टन कोळसा उतरवला जात आहे. कोळसा हा ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे तो समुद्रात पडत असल्याने त्या परिसरातील जल प्रदूषण होऊन मासे तेथून पलायन करीत आहेत. तसेच कोळसा हा सहज विघटन न होणारा असल्यामुळे कोळसा व समुद्राचे खारे पाणी यांचे अपघटन होऊन विषारी रसायन तयार होत आहे. त्यामुळे करंजा खाडीतील सागरी जैवविविधता व जलचरांचा नैसर्गिक अधिवास पूर्णत: नष्ट होऊ लागली आहेत. या आधीच सदर कंपनीने भर समुद्रात लाखो ब्रास दगड – मातीचा भराव करून हजारो मच्छिमारांच्या कुटूंबावर नांगर फिरवला आहेच.तसेच आता जिल्ह्यातील एकमेव सुरक्षित असणारी करंजा खाडीही या कोळशाच्या वाहतूकीमुळे उध्वस्त होणार आहे.त्यामुळे हजारो मच्छिमार कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होणार असल्याचे मासळी व्यावसायिक तथा करंजा मच्छिमार संस्थेचे संचालक हेमंत गौरीकर यांनी सांगितले.
कंपनीच्या मालवाहू जहाजांना करंजा खाडीतुन
परवानगी देताना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मच्छीमार आणि करंजा मच्छीमार संस्थेशी चर्चा केल्यानंतरच खाडीमार्ग निश्चित करण्याची आवश्यकता होती.मात्र मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मच्छीमार आणि संस्थेलाही अंधारात ठेऊन मालवाहतूक सुरू केली आहे.चॅनल नोटीफाय ( नौकानयन मार्ग ) निर्धारित न केल्याने करंजा खाडीत सुरू असलेल्या या मालवाहू जहाजांमुळे मच्छिमारांच्या जाळ्यांचेही मोठे नुकसान होऊ लागले आहे.मालवाहू जहाजे मच्छीमारांनी लावलेली जाळी व त्यांच्या निशाण्या ओढून नेत आहेत.त्यामुळे संतप्त झालेल्या अनेक मच्छिमारांनी करंजा मच्छीमार संस्थेकडे तक्रारी केल्या आहेत. संस्थेने कंपनीला पत्र देऊन मच्छीमारांच्या जीवावर उठलेली कोळशाची वाहतूक तत्काळ बंद करण्याची मागणी केली आहे.त्वरित वाहतूक बंद न केल्यास समुद्र खाडीतच मालवाहू बोटी रोखण्यासाठी आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आली असल्याची माहिती करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र कोळी यांनी दिली.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *