ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी अनिल थोरात तर उपाध्यक्षपदी गौतम कांबळे यांची निवड

September 13, 202113:28 PM 31 0 0

नांदेड – येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल थोरात यांची राजरत्न आंबेडकर प्रणित भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हाध्यक्षपदी, उपाध्यक्षपदी गौतम कांबळे तर उपविभागीय अध्यक्ष म्हणून सुभाष लोखंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नांदेड जिल्हा कार्यकारणीची बैठक दि. ११ सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य कमिटीचे पदाधिकारी दिनेश हनुमंते व वैभव धबडगे यांची उपस्थिती होती.
दी बुद्धिस्ट सोसायटी आॕफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ट्रस्टी चेअरमन आदरणीय राजरत्न आंबेडकर हे जिल्हानिहाय कार्यकारण्यांची निवड प्रक्रिया करण्यासाठी चार दिवसीय मराठवाडा दौऱ्यावर होते एका दिवशी दोन जिल्हे यानुसार ९ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीतील हा दौरा औरंगाबाद येथून सुरु झाला. त्यानुसार ११ रोजी नांदेड जिल्हा कमिटी निवडण्यासाठी राजरत्न आंबेडकर हे नांदेड येथे आले होते. उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे संजय कदम (महासचिव), प्रकाश चंद्रे (कोषाध्यक्ष), सतिश भवरे (संस्कार प्रमुख ), विकास राऊत (मुख्य संघटक), गंगाधर ढवळे (प्रसिद्धी प्रमुख), राजकुमार कवडे (जिल्हा सचिव), अॅड. यशवंत हानुमंते (पर्यटन प्रमुख तथा विधी सल्लागार), संदिप पंतगे (समता सैनिक दल), अनिता गोडबोले (महिला अध्यक्ष) , सुभाष लोखंडे ( नांदेड उपविभाग), श्रावण तेले (भोकर उपविभाग), अरविंद कांबळे (किनवट उपविभाग).

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *