ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

माजी विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्ष पदी अनिरुद्ध पाटील यांची निवड

November 10, 202116:51 PM 51 0 0

उरण (संगिता पवार ) उरण पुर्व विभागातील पिरकोण येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्ष पदी अनिरुद्ध पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

उरण तालुक्यातील पाले या छोट्याशा गावात जन्मलेल्या अनिरुद्ध पाटील यांनी पिरकोन येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात आपले शिक्षण घेतले.अनिरुध्द पाटील हे शांत, मनमिळाऊ ,प्रेमळ स्वभावानी पुर्व विभागात प्रसिद्ध असून ते एक आदर्श ग्रामसेवक म्हणून शासकीय सेवेत रुजू आहेत.त्यांनी आपल्या परिसरातील गोरं गरीब मुलांनी, विद्यार्थ्यांनी उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी सक्षम व्हावे यासाठी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.अशा हुरहूरी अनिरुद्ध पाटील यांची सर्वानुमते पिरकोण येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या उपाध्यक्ष पदी निवड झाल्याने विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या सह पालक, विद्यार्थी वर्गाने अनिरुद्ध पाटील यांचे अभिनंदन केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *