जालना (प्रतिनिधी)ः लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी शाळेत पाय न ठेवता आपल्या साहित्याच्या माध्यमातून आपले नाव जगाच्या पाठीवर कोरले आहे. कष्टकरी व वंचित घटकांसाठी अजिवन लढा देवून न्याय देण्याचा प्रयन्य केला असे प्रतिपादन आ. कैलास गोरंट्याल यांनी येथे बोलतांना केले. जालना शहर कॉग्रेस कमिटीच्या वतीने लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी रविवार रोजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी जालना जिल्हा कॉग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहर कॉग्रेस अध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत रत्नपारखे, सुरेश घोडे, सोपान शेजुळ आदींंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना आ. गोरंट्याल म्हणाले की, अण्णाभाऊ साठे हे वर्गरहीत समाजाचे स्वप्न उराशी बाळगून आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावणारे ध्येयवादी लेखक होते. उपेक्षित, वंचित, कष्टकरी घटकांचे शोषण संपविण्यासाठी अजीवन लढा देणारे खरे लढवय्ये आहेत.
अण्णाभाऊ साठे यांनी समाजाचे विदारक असे वास्तव्य आपल्या साहित्यातून जगासमोर मांडले. शाळेची पायरी न चढलेले अण्णाभाऊ साठे यांनी विपुल असे लेखन केले आहे. त्यामुळेच अण्णाभाऊ साठे हे प्रतिभावंत लेखक म्हणून ओळखले जातात. आपल्या देशामध्ये माणसांना चौकटीत कोंडण्याचा अट्टाहास असल्याने अण्णाभाऊंच्या मोठेपणाचे मूल्यमापन अद्याप झाले नाही असे सांगुन महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात त्यांच्या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण असून अण्णाभाऊंचे विचार समाजमनात रुजविण्याची आज नितांत गरज असल्याचे शेवटी गोरंट्याल म्हणाले. कार्यक्रमाचे प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवान करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक अरुण मगरे, विनोद यादव, सजू गायकवाड, अरुण घडलिंग, फकीरा वाघ, दत्ता पाटील, बंडु डोईपोडे, सागर ढक्का, आकाश लाखे, सोनू आघाम, कृष्णा हिवाळे, विलास आघाम, अशोक खाडे, विलास हिवाळे, बंडु डोईपोडे आदी पदाधिकारी व कार्यकर्तें उपस्थित होते.
Leave a Reply