ताज्या बातम्या
   महिलांनी महिलांसाठी सुरु केलेल्या वृत्तपत्रात काम करण्यासाठी महिलांना निमंत्रित करीत आहोत. संपर्क साधण्यासाठी सातारा - विद्या निकाळजे (कार्यकारी संपादक -8600080064), नांदेड-रुचिरा बेटकर (कार्यकारी संपादक-9970774211), मुंबई-संगिता ढेरे (विभागीय संपादक मुंबई व नवी मुंबई-8097112945), रायगड - दिक्षा थवाई (जिल्हा प्रतिनिधी-9763025014) यांना संपर्क साधू शकता. पाहिजेत : अवघ्या काहीच दिवसात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी या वृत्तपत्रात काम करण्यासाठी राज्यभरात जिल्हा, तालुका स्तरावर प्रतिनिधी नियुक्त करायचे आहेत. इच्छुकांनी आम्हाला [email protected] या मेलवर आपला बायोडेटा पाठवावा किंवा 9850516724 या नंबरवर कॉल किंवा व्हाट्स अँप करु शकता.

देगाव चाळ येथे बौद्ध उपासक उपासिकांकडून अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

August 7, 202113:57 PM 23 0 0

नांदेड – शहरातील देगावचाळ येथील प्रज्ञा करुणा विहारात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.‌ सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.‌ विहारात आषाढी पौर्णिमेपासून धम्मपद कथा आणि गाथांचे वाचन सुरू आहे.

याच कार्यक्रमात बौद्ध उपासक व उपासकांनी अण्णाभाऊ साठे जयंती साजरी केली. त्रिसरण पंचशील आणि त्रिरत्न वंदनेनंतर धम्मकथा आणि गाथांचे वाचनास प्रारंभ झाला. दरम्यान अवंती कदम विद्यार्थिनीचे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित भाषण संपन्न झाले. यावेळी मुख्य धम्मपद गाथा व कथा वाचक राहुल कोकरे, सुभाष लोखंडे, प्रेम गोडबोले, लखन नरवाडे, शोभाबाई गोडबोले, सौ. चौत्राबाई चींतूरे, शिल्पा लोखंडे, गुलाबाई खाडे, आशाबाई हटकर, सौ. गोदावरी बाई लांडगे, सौ. छायाबाई थोरात, सौ. पदमीनबाई गोडबोले, गिताबाई खाडे गिरजाबाई हिंगोले लक्ष्मीबाई खाडे सौ सुमनबाई वाघमारे, सौ. निर्मलाबाई पंडित, धम्मा बाई नरवाडे, जिजाबाई खाडे यांच्यासह परिसरातील बालक बालिका महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजक सुभाष लोखंडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.

Categories: महाराष्ट्र
share share TWEET PIN IT SHARE share share
Leave a reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *