नांदेड(प्रतिनिधी)-साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती पोलीस अधिक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
आज 1 ऑगस्ट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी गृहपोलीस उपअधिक्षक विकास तोटावार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, नियंत्रण कक्षातील अभिजित शिंदे, जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे, महिला सहाय्य कक्षातील सहाय्यक पोलीस निरिक्षक अशोक कोलते, नियंत्रण कक्षातील वाठोरे, पोलीस कल्याण विभागाचे शिवप्रकाश मुळे, नियंत्रण कक्षातील पोलीस उपनिरिक्षक कांबळे, आर.सी.पी., स्थानिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, येथील अनेक पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार या कार्यक्रमात उपस्थित होते. जनसंपर्क कार्यालयातील पोलीस अंमलदार उत्तम वाघमारे आणि रेखा इंगळे यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
Leave a Reply